बैल अनेकदा माणसांवर आक्रमकपण हल्ला करतात. सोशल मीडियावर बैल किंवा गायीने हल्ला केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका काहीसा प्रसंग लाइव्ह टीव्ही कव्हरेजदरम्यान एका पाकिस्तानी महिला पत्रकाराबरोबर घडला आहे. एका बैलाने महिला पत्रकारावर हल्ला केल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

व्हायरल व्हिडीओची सुरुवातीला महिला पत्रकार स्थानिक व्यावसायिकांशी बैलांच्या दराबाबत संवाद साधताना दिसते “ होय, व्यापाऱी व्यवहार करण्यासाठी करण्यास तयार नाहीत. ते ५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत स्वीकारणार नाहीत….),” असे ती व्हिडिओमध्ये म्हणते. तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच बाजूने एक बैल येतो आणि तिला जोरदार धडक मारतो आणि ज्यानंतर महिला जोरजोरत किंचाळते आणि बाजूला जाऊन पडते. व्हिडीओमध्ये महिला पडल्याचे दिसत नाही. एक व्यक्ती महिलेला माईक उचलून देतो.

हेही वाचा – “हे फक्त भारतातच होऊ शकतं!” T-20 World Cup जिंकल्यानंतर भारतीय संघाला तरुणाची हटके सलामी, पाहा Viral Video

व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओला २,८९,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आणि वापरकर्त्याने कमेंट केली, “लाइव्ह टीव्हीवर हा एक अनपेक्षित आणि धक्कादायक क्षण होता. अशा धोकादायक परिस्थितीत संयम राखल्याबद्दल रिपोर्टरचे अभिनंदन. क्षेत्रात सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “नेहमीप्रमाणे, कॅमेरामनने कधीही मदत केली नाही.”

“मला परत एक धडक होईल अशी अपेक्षा होती पण दृश्यात मोठा ट्विस्ट येतो,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – पुणे तिथे काय उणे! प्रवाशांच्या गर्दीमुळे चक्क मेट्रोही पडली बंद, Video होतोय तुफान Viral

एप्रिलमध्ये, बंगळुरूमध्ये एका बाईकस्वारावर बैलाने हल्ला केल्याता व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. वृत्तानुसार, महालक्ष्मी लेआउट स्विमिंग पूल जंक्शनजवळ ही घटना घडली. व्हिडीओमध्ये परफॉर्मन्ससाठी कपडे घातलेला बैलाने दुचाकीस्वाराला हल्ला केला. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. बैलाच्या धडकेने त्या व्यक्तीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली फेकले, सुदैवाने दुचाकीस्वार जिंवंत राहण्यात यशस्वी झाला.