Bull attack video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. यामध्ये एक चवताळलेला बैल चक्क मोबाईल रिपेअरींगच्या दुकानात घुसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडिओ एका मोबाईल रिपेअरिंग दुकानाचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन लोक एका छोट्या दुकानात मोबाईल दुरुस्त करत आहेत, तर एक व्यक्ती काउंटरवर उभी आहे. काही काळ सर्व काही सुरळीत राहते, पण अचानक काहीतरी पाहून या लोकांना धक्का बसतो. आत बसलेले दोन्ही तरुण उभे राहतात आणि त्यांना काही समजायच्या आधीच एक मोठा बैल तिथे उडी मारतो.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बैल सरळ काउंटरच्या आत उडी मारतो, यावेळी काउंटरच्या बाहेर उभा असलेला व्यक्ती थोडक्यात बचावतो, तर आत उपस्थित असलेले दोन तरुण कोपऱ्यात एकमेकांना चिकटून बसतात. बैल तेथे उपस्थित फोन आणि इतर वस्तू पूर्णपणे उध्वस्त करतो. बैलाच्या भीतीमुळे एक तरुण खुर्चीच्या साहाय्याने वर चढण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरा खुर्चीच्या मागे लपतो. बैल आत येताच तो शांत होतो आणि काउंटरमधून बाहेर कसे पडावे हे त्याला समजत नाही. बैल कसा बाहेर येतो हे व्हिडिओमध्ये दाखवलेले नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हेल्मेट न घालता गाडी चालवता? मग कीबोर्डवर Q आणि R मध्ये पाहा; दिल्ली पोलिसांनी ट्रेंड फॉलो करत केलं सावधान

लोकांनी केल्या मजेशीर कमेंट्स

सध्या हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूजर्स या व्हिडिओवर खूप मजेदार कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिले, “आज तुमचा भाऊ फोन दुरुस्त करेल” तर दुसऱ्या यूजरने लिहिले, “तो कशासाठी आलाय तेच विसरला.”