Viral video: जगात सर्वात जास्त प्रेम करणारे आई-वडिल बऱ्याचदा आपल्या मुलांच्या जीवावर उठतात. असा विचार केला तरी अंगावर काटा येतो. मात्र प्रत्यक्षात अशा काही घटनाही समोर येतात जिथे आई-वडिल मुलांसाठी काळ ठरतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. स्वत:च्या हट्टपायी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही पालक आपल्याच मुलांना नको ते करायला भाग पाडतात. किंवा आपल्यासोबतच आपल्या मुलांचाही जीव धोक्यात घालतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून बाप आहे की हैवान? असा प्रश्न तुम्हीही विचाराल…

एका वडिलांनी स्वत:ची हौस पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलासोबत बंजी जंप करताना दिसत आहेत. बंजी जंपिंग दरम्यान, वडील कोणत्याही सुरक्षेशिवाय मुलाला आपल्या मिठीत धरुन हजारो फूट उंचावरुन उडी मारत आहेत. जे खूप धोकादायक आहे. या बंजी जंपिंगमध्ये वडिलांनी पूर्ण सुरक्षितता घेतली आहे पण मुलाला ना बांधले आहे ना सुरक्षेसाठी कोणते जॅकेट घातले. यामध्ये वडिलांचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक या वडिलांना जगातील सर्वात वाईट पिता म्हणत अटक करण्याची मागणी करत आहेत. कोणत्याही सुरक्षिततेशिवाय आपल्या मुलाला आपल्या मिठीत घेऊन हजारो फूट उंचीवरून उडी मारणे खरोखरच धोकादायक आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अमेरिकेची लेक भारताची सून; अमेरिकन नवरी नवऱ्याला चोरून पाहतानाचा VIDEO तुफान व्हायरल

हा व्हिडिओ लाफ्टरकलर्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत २ मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहण्यात आले आहे, तर जवळपास ३१ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. यावर युजर्स कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले… मला वाटते बंजी जंपिंगसाठी वयोमर्यादा असली पाहिजे. दुसऱ्या यूजरने लिहिले… मूर्ख वडील, त्याला माहित नाही का ते किती धोकादायक असू शकते? तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…त्याला अटक केली पाहिजे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी असंच एक प्रकरण समोर आलं होतं, यामध्ये फिटनेसबाबत सतर्क असणाऱ्या बापाने आपला मुलगा जाड असल्याने त्याचा जीव घेतला आहे. सहा वर्षीय मुलाचं वजन जास्त असल्याने एका बापाने अत्यंत संतापजनक कृत्य केले आहे. बालकाचं वजन कमी करण्यासाठी अवघ्या ६ वर्षाच्या मुलाला जीममध्ये नेऊन ट्रेडमिलवर पळवले. मशीनवर अधिक धावल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. 

Story img Loader