Bungee Jumping Viral Video: सध्या तरुणांचे साहसी खेळांमध्ये सहभागी होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. साहसी खेळांमध्ये सहभागी होणे हा जणू ट्रेंडच झाला आहे. एकापेक्षा एक वरचढ असे साहसी खेळांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. काही खेळ तर इतके भयानक असतात जे पाहून लोकांना घाम फुटतो. सध्या बंजी जंपिग हा एक रोमांचक आणि थरारक खेळ झाला आहे ज्याचा अनुभव प्रत्येकाला घ्यायचा असतो. साहसी खेळाचा अनुभव घेण्याची होस पूर्ण करण्यासाठी तरुणाई सर्व धोके देखील पत्करायला तयार होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वसाधारण बंजी जंपिंगदरम्यान, लोकांना सेफ्टी हार्नेसने बांधले जाते आणि त्यानंतर डोंगरावरुन किंवा एखादया धबधब्याच्या किनाऱ्यावर उभे राहून उंचावरून खाली उडी मारतात. बंजी जंपिगचे असे व्हिडिओ पाहूनच लोक थक्क होतात. सेफ्टी हार्नेसमुळे बंजी जंपिग करताना कोणतीही दुखापत होत नाही. पण वजन जास्त असल्यास किंवा हार्नेसची दोरी जुनी झाल्यास दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही.

हेही वाचा- Shark Attack : सर्फिंग करणे बेतले जीवावर! शार्कच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, लोकांमध्ये परसली दहशत

बंजी जंपिंग दरम्यान तुटली दोरी, व्हिडिओ व्हायरल

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बंजी जंपिंगदरम्यान घडलेली भयानक प्रसंग कैद झाला आहे. या व्हिडिओत एक मुलगी कित्येक फुट उंचीवरुन नदीमध्ये उडी मारते पण अचानक हार्नेसची दोरी तुटते आणि ती नदीमध्ये पडते. हा थरारक व्हिडिओ पाहून अंगावर काटा येत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर कित्येक प्लॅटफॉर्मवरुन शेअर केला जात आहे, जो सीसीटीवी इडियट्स नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीने लॉन्चिंग पॅडवर उभी असताना सर्व सुरक्षा देणाऱ्या गोष्टी वापरल्या आहेत आणि ती उडी मारण्यासाठी सज्ज झाली आहे. जशी ती उडी मारते तसा दोरीवर जोर पडतो आणि अचानक दोरी तुटते आणि मुलगी थेट नदीमध्ये जाऊन पडते. या घटनेत मुलीसोबत काय घडले याची कोणतीही खात्रीपूर्वक माहिती उपलब्ध नाही. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत ज्यामध्ये ती मुलगी वाचल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ९ मिलियन म्हणजे ९० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bungee jumping goes horribly wrong as elastic cord breaks midwayviral video snk