Burger king mould-infested burger viral post: आजकाल लोक पौष्टिक आहारापेक्षा जंक फूड, फास्ट फूडची निवड जास्त प्रमाणात करतात. १५ ते २० मिनिटांत घरपोच डिलिव्हरी होणारं हे फास्ट फूड सगळ्यांच्याच आवडीचं झालंय. त्यातल्या त्यात बर्गर हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण, जर तुम्ही बर्गरची ऑनलाइन ऑर्डर दिली आणि डिलिव्हरी मिळताच बर्गरवर बुरशी लागलेली दिसली, तर तुमची असा बर्गर खाण्याची पुन्हा कधी इच्छा होईल का? नाही ना! पण अशीच एक घटना दिल्लीत घडलीय, जिथे एका पत्रकारानं बर्गर ऑर्डर केला आणि त्याला बुरशीचा थर साचलेला एक बर्गर मिळाला. याबद्दल त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय, जी सध्या व्हायरल होतेय.

व्हायरल पोस्ट

दिल्ली येथील यमन देव शर्मा या पत्रकारानं नुकतीच एक पोस्ट एक्स अकाउंटवरून शेअर केली आहे, जी सध्या तुफान व्हायरल होतेय. शर्मा यांनी ‘बर्गर किंग’वरून फ्रेंच फ्राईज आणि ‘व्हेज व्हूपर’ बर्गरची ऑर्डर दिली होती. “झोमॅटोद्वारे मी ‘बर्गर किंग’मधून एक ऑर्डर केली. माझे फ्राईज खाऊन झाल्यावर मी बर्गर खाण्यासाठी त्याचं पॅकेट उघडलं आणि मला कळलं की, त्यांनी एक नवीन फ्लेवर लाँच केलाय, ज्यात बर्गरबरोबरच बुरशी फ्रीमध्ये येते,” अशी कॅप्शन देत शर्मा यांनी ‘बर्गर किंग’ आणि ‘झोमॅटो’ला टॅग केलं.

Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Shocking video Caution For Momo Lovers! Vendor Spotted Kneading Momo Dough With Feet In Jabalpur
तुम्हीही रस्त्यावरचे मोमोज मोठ्या आवडीने खाता ना? विक्रेत्याचा ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहून झोप उडेल
Amchya Papani Aanla Ganpati song sung by the little one
लाडक्या बाप्पासाठी चिमुकल्याने गायले “आमच्या पप्पांनी गणपती आणला”गाणे, गोंडस हावभाव बघून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू, पाहा Viral Video

बर्गर किंगची प्रतिक्रिया

पोस्ट व्हायरल होताच ‘बर्गर किंग इंडिया’नं @burgerkingindia यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी रिप्लाय देत लिहिलं, “हाय यमन, तुम्हाला असा अनुभव देण्याचा आमचा कधीही हेतू नसतो. तुम्ही कृपया आम्हाला तुमचा संपर्क क्रमांक, स्टोअरचं स्थान, ऑर्डर आयडी आणि ईमेल आयडी मेसेज करू शकता का; जेणेकरून आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकू. खात्री बाळगा, आम्ही याची सखोल चौकशी करू.”

‘बर्गर किंग’बरोबरच ‘झोमॅटो’नंदेखील त्यांच्या @zomatocare या एक्स अकाउंटवरून प्रतिक्रिया दिली. “हे अतिशय धक्कादायक आहे. तुम्हाला यातून जावं लागलं याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही यात लक्ष घालू. यादरम्यान, आमच्या टीमचा एक सदस्य तुम्हाला नक्कीच कॉल करील. त्यासाठी कृपया तुमचा नोंदणीकृत संपर्क क्रमांक आम्हाला मेसेज करा.”

हेही वाचा… Ganesh Chaturthi outfits ideas for Women: यंदाच्या गणेशोत्सवासाठी हटके दिसायचंय! मग बहिणींनो ‘हे’ ५ आऊटफिट्स नक्कीच ट्राय करा

युजर्सच्या प्रतिक्रिया

यमन शर्मा यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “तुम्ही या प्रकरणात झोमॅटोला दोष देऊ शकत नाही. शेवटी डिलिव्हरी एजंट अन्न उघडून तपासू शकत नाहीत. ते उघडलं, तर तुम्ही आमचं जेवण खाता, असा आरोप आपणच त्यांच्यावर करतो. इथे ‘बर्गर किंग’ला जबाबदार धरलं पाहिजे.” तर दुसऱ्यानं “त्यांच्या ॲपद्वारे ऑर्डर देण्यात आली असल्यानं, ही त्यांचीदेखील जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी ‘बर्गर किंग’ला काहीही पैसे देऊ नयेत,” अशी कमेंट केली. तर अनेकांनी रिप्लाय देत आपले अनुभवदेखील शेअर केले आहेत.