-अंकिता देशकर

Prabhu Shri Ram Photo On Burj Khalifa: अलीकडेच रामनवमी होऊन गेली. कोणताही सण म्हंटला की सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल होत असतात. याच न्यायाने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असलेले एक चित्र रामनवमीला समोर आले. दुबईच्या बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर प्रभू रामाची प्रतिमा लावण्यात आल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसने या व्हायरल फोटोची पडताळणी केली असता या व्हायरल पोस्टचे सत्य समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होता दावा?

फेसबुक वापरकर्ता, अजय पांडे यांनी हे चित्र शेअर केले आणि हिंदीत लिहिले होते की, “रामनवमीच्या मुहूर्तावर #बुर्ज_खलिफा वर मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रजीचे चित्र लावण्यात आले होते. ??जय श्री राम ??” या पोस्टवर जवळपास ५ हजार लाईक्स, ९२० कमेंट्स आणि १९७ शेअर्स होते. ही पोस्ट फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आली. तर ट्विटरवर सुद्धा ही पोस्ट बरीच व्हायरल झाली होती.

इंडियन एक्सप्रेसने केलेल्या तपासात आपण प्रथम फोटो झूम केले ज्यानुसार बुर्ज खलिफा आणि त्यावर प्रक्षेपित केलेली प्रभू रामाची प्रतिमा दोन्ही नीट पाहता आले त्यानंतर फोटोवर गूगल रिव्हर्स इमेज शोध करताच सदर फोटो हा मूळ आणि स्टॉक इमेज वेबसाइट्सवर ‘बुर्ज खलिफाचे रात्रीचे दृश्य’ अशा हेडिंगसह दिसून आला. फोटोच्या कॅप्शनमध्ये, “दुबई, यूएई – डिसेंबर 28, 2015: बुर्ज खलिफा टॉवरचे रात्रीचे दृश्य. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे (828 मीटर)” असे म्हटले होते. याशिवाय बुर्ज खलीफाच्या सोशल मीडियावर सुद्धा प्रभू रामाचा फोटो प्रक्षेपित केल्याचा कुठलाच फोटो किंवा व्हिडिओ आढळला नाही.

दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो बुर्ज खलिफावर प्रक्षेपित करण्यासाठी वापरण्यात आलेले अॅप ‘बियुगो’ वापरून त्याच पद्धतीने श्रीरामाचे फोटो बुर्ज खलिफावर असल्याचे दाखवले आहेत.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात इंडियन एक्सप्रेसने दुबईस्थित पत्रकार अहमद अतेय्या आणि मायोवा अडेगोके यांच्याशी चर्चा करून पुष्टी केली की बुर्ज खलिफावर अशी कोणतीही प्रतिमा दाखवलेली नाही.

हे ही वाचा<< परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का; खासदारांकडे ना घर, ना जमीन, हाताशी फक्त…

इंडियन एक्स्प्रेसने एमार (बुर्ज खलिफाचे विकासक) येथील कॉर्पोरेट मार्केटिंग विभागाच्या सौहा अब्बास यांच्याशीही संपर्क साधला, त्यांनी सांगितले की, “जे काही प्रक्षेपित केले जाते ते बुर्ज खलिफाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर देखील पोस्ट केले जाते. जर अधिकृत हँडलवर फोटो उपलब्ध नसेल, तर निश्चितपणे बुर्ज खलिफावर तसा फोटो प्रक्षेपित केलेला नसतो.”

निष्कर्ष: रामनवमीला श्रीरामाचा कोणताही फोटो बुर्ज खलिफावर लावलेला नव्हता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burj khalifa lights up prabhu shri ram photo on ramnavmi fact check of viral image since a week watch reality svs