राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हायवेवर वेवर एका धावत्या कारनं अचानक पेट घेतल्यानं प्रवाशांना बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. ही घटना लालसोट-कोटा मेगा हायवेवर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारला अचानक आग लागल्याने चालकाने तातडीनं कारच्या बाहेर उडी मारून स्वत:चा जीव वाचवला. कारला आग लागल्यानंतर धुराचे लोळ आकाशात जाताना या व्हिडीओत दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानमधील एका कारला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. कारमध्ये असलेला चालक वेळीच सावध होऊन बाहेर निघाला. त्यामुळे त्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही. दैव बलवत्तर म्हणून तो वाचला, असं म्हणतात ना, तसंच काहीसं या घटनेत पाहायला मिळालं आहे. हायवेवर कारला लागलेली आग आटोक्यात आणताना धुराचे लोळ आकाशात जाताना दिसत आहेत. कार हायवेच्या सुरक्षा कठड्याला जाऊन थांबल्याने मोठा अपघात होण्याचा अनर्थ टळला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

इथे पाहा व्हिडीओ

या घटनेचा व्हिडीओ सवाई माधोपूर जिल्ह्याच्या एका उड्डाणपुलावर रेकॉर्ड केला आहे. कारचा अपघाता झाल्यानंतर लोकांना घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी झालेल्या गर्दीतून एका माणसाने हा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. कारला लागलेल्या भीषण आगीमुळं कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करुन कारला लागलेली आग विझवली. त्यामुळे हायवेवरून जाणाऱ्या इतर वाहनांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burning car on rajasthan highway driver jumps immediately and escapes shocking video goes viral on twitter nss