बसमधून विनातिकिट प्रवास करणारी अनेक माणसं दिसतील. जोपर्यंत कंडक्टर विचारत नाही तोपर्यंत कशाला तिकीटाचं नाव काढा? अशी लोकांची मानसिकता असते. त्यातून गर्दीच्यावेळेत तर काही प्रवासी याचा खूपच गैरफायदा घेतात. कामाच्या वेळांत बसमध्ये एवढी गर्दी असते की मुंगीलाही आत शिरायला जागा मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवाशांच्या आसनावर जाऊन तिकीट देण्यापेक्षा गर्दीत कुठेतरी अडकलेला कंडक्टर लांबूनच ‘तिकीट तिकीट तिकीट…’ ओरडत असतो. काही प्रामाणिकपणे तिकीट काढतातही. मात्र काही कंडक्टरच्या अडचणीचा गैरफायदा घेत मागच्या मागेच तिकीट न काढताच निघून जातात.

वाचा : ऐकावं ते नवलच!; कबुतराचं तिकीट काढलं नाही म्हणून बस कंडक्टरला मेमो

पण यावर हरयाणाच्या एका कंडक्टरनं भन्नाट उपाय शोधला आहे. गावात आधीच दिवसातून बसच्या एक किंवा दोन फेऱ्या होतात. बसची संख्या कमी असल्याने बसला नेहमीच गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांनी बस इतकी खचाखच भरलेली असते की विचारायची सोय नाही. तेव्हा गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी तिकीट न काढताच बसने प्रवास करतात. त्यामुळे अशा गर्दीत प्रत्येक प्रवाशांपर्यंत पोहोचून त्यांनी तिकीट काढली आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी हा कंडक्टर चक्क आसनांवर माकडासारखा उड्या मारत संपूर्ण बसभर फिरत असतो. त्याची ही कसरत अनेकांना रोजची असेल पण आपल्यासारख्या लोकांनी मात्र हे पूर्वी कधी पाहिलं नसेल हे नक्की! म्हणूनच की काय त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : ६० तास, १४० किलोमीटरच्या पायी प्रवासात मूत्र प्राशन करून ‘तो’ जगला

Story img Loader