Bengaluru Bus Accident Video:  सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अपघाताचे अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच थक्क व्हायला होतं. असाच एक चक्रावून टाकणारा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ बस अपघाताचा आहे. अलीकडच्या काळात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणार्‍या अपघातामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. आता असाच एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. नेमके घडले काय, हे व्हायरल व्हिडीओतून पाहा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. बेंगळुरूच्या गजबजलेल्या रस्त्यांवर गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवणे प्रत्येकासाठी खरंच एक आव्हान असते. अशा परिस्थितीत लोकही जपून गाडी चालवतात. पण, इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बस अचानक नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे.

बेंगळुरूमधील हिबल उड्डाणपुलावर व्होल्वो बसच्या चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि त्याने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फ्लायओव्हरवर जाम असल्याचे दिसून येत आहे. यानंतर वाहने संथ गतीने जाऊ लागतात. त्यानंतर बस पुढे सरकली आणि चालकाने आधी दुचाकीस्वाराला धडक दिली आणि नंतर ती बस पुढे जात राहिली. या वेळी इतर अनेक वाहनांना त्या बसची धडक बसली. बस एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यानंतर तिने एका कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याच्या पुढील कारलाही बसने धडक दिली. अशा प्रकारे या बसनं एकामागून एक तीन ते चार गाड्यांना जोरदार धडक दिली. सुदैवाने बसचा वेग जास्त नव्हता, त्यामुळे मोठी हानी टळली.

(हे ही वाचा : एकट्या जिराफाची शिकार करायला आले अर्धा डझन सिंह; पण गेम पलटला, जिराफाने असं काय केलं? पाहा Video )

येथे पाहा व्हिडीओ

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत झाली आहे. बसचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अपघात टळल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. व्हिडीओमध्ये बस वाहक चालकाच्या सीटकडे धावताना आणि हातवारे करून ब्रेक का लावत नाही, असे विचारताना दिसत आहे. बसचे विंडशील्ड तुटले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला होता, पण ब्रेक लावता आला नाही, असे सांगण्यात येत आहे. ही घटना बीएमटीसीच्या व्होल्वो बसमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus driver in bengaluru allegedly lost control and crashed into several bikes and cars on the hebbal flyover pdb