देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतो आहे. नदी, नाल्यांना पूर आले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. अनेक ठिकाणी वाहनं, घरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. शक्य असेल तर घरीच राहा, गरज नसेल तर बाहेर पडणं टाळा, असं आवाहन सरकार, प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक कारण नसताना बाहेर पडतात. बऱ्याचदा नको तिथे धाडस दाखवायला जातात आणि जीव धोक्यात घालतात. लोक निष्काळजीपणाने आपला तसेच इतरांचा जीव धोक्यात घालतात. असाच एक व्हिडीओ सामोआमधून समोर आला आहे,

दरम्यान सामोआमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, येथे चालक प्रवाशांनी भरलेली बस पाण्याच्या जोरदार प्रवाहाच्या आत घेऊन क्रॉस करू लागतो. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पाणी एवढ्या वेगाने वाहत आहे की, काही वेळातच ते बस प्रवाहासोबत वाहून जाते. प्रवाशांनी भरलेली बस पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाते. यादरम्यान बसमध्ये उपस्थित प्रवाशांच्या किंकाळ्या स्पष्ट ऐकू येतात. काही वेळातच अर्ध्याहून अधिक बस पाण्यात बुडून वाहू लागते. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बस ज्या बाजूला वाहत आहे, त्या बाजूला दूरपर्यंत फक्त पाणीच दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – सावधान! पूर्ण रिकाम्या मेट्रो स्टेशनवर पाहा कशी होते मोबाईल चोरी; मोबाईल चोराचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून गाडीच्या ड्रायव्हर टिका करत लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader