Bus Running In Flooded Water Viral Video: रस्त्यावरून प्रवास करताना भलेमोठे ट्र्क, बस जेव्हा बाजूने जातात तेव्हा क्षणभर का होईना पण थोडी धडकीच भरते, हो ना? या भल्या मोठ्या कंटेनर्स व ट्र्क चालकांना ‘हेव्ही ड्रायव्हर’ असं म्हणतात. थोडक्यात अर्थ सांगायचा तर असे चालक जे असामान्य परिस्थितीतही गाडी चालवू/ पळवू शकतात. काही वेळा हाच अति आत्मविश्वास या चालकांच्या जीवावरही बेतला आहे. सोशल मीडियावर सध्या अशाच एका बस ड्रायव्हरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चक्क पुराच्या पाण्यातून त्याने ज्या वेगाने बस बाहेर काढली त्या कौशल्याचं खूप कौतुक आहे.
काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने संपूर्ण न्यूझीलंडमध्ये कहर केला होता. पावसाच्या दरम्यान, झाडे उन्मळून पडणे, पूर येणे आणि प्रमुख रस्ते आणि रेल्वे मार्ग बंद झाल्याचे सुद्धा प्रकार घडले होते. अनेकांनी सोशल मीडियावर पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे चित्र आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये एक बस चालक पुराच्या पाण्यातून बस चालवताना दिसत आहे.
डेबी बरोज नावाच्या एका स्थानिकाने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. तुम्हीही हे दृश्य पाहून कदाचित यावर विश्वास ठेवू शकणार नाही. व्हिडीओमध्ये पुराच्या पाण्याने रस्ता व्यापला आहे आणि गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. फक्त गाड्यांचे छत दिसत आहे. याच स्थितीचं रेकॉर्डिंग करत असताना, एक बस पाण्याजवळ येते आणि त्यातून वेगाने बाहेर पडते.
पुराच्या पाण्यातून भरधाव बसची एंट्री
हे ही वाचा<< मेट्रोमध्ये प्रवाशाच्या अंगावर चढला उंदीर; झोपमोड होताच तरुणाने जे केलं.. Video पाहून बसेल धक्का
ही पोस्ट शेअर केल्यापासून, याला अनेकांनी लाईक केले आहे. कमेंट्स मध्ये अनेकांनी बस ड्रायव्हरचे कौतुक करून त्याला नक्कीच यासाठी जास्त पैसे द्यायला हवेत असे म्हंटले आहे. काहींनी मात्र हा सगळा अति आत्मविश्वासाचा खेळ असून अशाप्रकारे स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याची काहीच गरज नसल्याची कमेंट केली आहे.