Viral news: आतापर्यंत एटीएम, पैसे किंवा पाकिट चोरी होण्याच्या अनेक घटना तुमच्यासमोर घडल्या असतील. सोशल मीडियावर एका बसस्टॉपच्या जागेचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. यानुसार बंगळुरू शहरातील एक बसस्टॉप चोरीला गेलं आहे. ही घटना वाचून तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या माध्यमातून हे स्पष्ट होत आहे. बंगळुरूमधलं हे काही पहिलं प्रकरण नाही, याआधीही पुणे, नागपूर याठिकाणाहून बस स्टॉप चोरीला गेले आहेत. मात्र सध्या बंगळुरूच्या बसस्टॉपची चर्चा आहे.
काल होता, आज कुठे गेला? चक्क बसस्टॉपच चोरीला
बंगळुरू शहरातील गजबजलेल्या कनिंगहॅम रोडवर हा बस स्टॉपला निवारा बसवण्यात आला. ज्या कंपनीला निवारे उभारण्याचे काम देण्यात आले आहे, त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीबीएमपीने शहरात बस निवारे बांधण्याचे काम एका कंपनीला दिले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत कंपनीचे अधिकारी एन रवी रेड्डी यांनी तक्रार दाखल केली आहे. जे निवारे बांधण्यात आले होते ते स्टेनलेस स्टीलचे होते, जे खूप मजबूत असून त्याची किंमत १० लाख इतकी आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरु
पोलिसांनी आयपीसी कलम २७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. २१ ऑगस्ट रोजी हा निवारा बसवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पण, २८ ऑगस्ट रोजी कंपनीचे कर्मचारी हा निवारा पाहण्यासाठी गेले असता त्यांना घटनास्थळी काहीही दिसले नाही. यानंतर त्यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांकडे धाव घेतली.
हेही वाचा >> ‘मला साबण आवडतो’ म्हणत मुलीने साबणच खाल्ला; Videoची खरी बाजू बघून बसेल धक्का
दरम्यान, अनेकांनी या घटनेकडे गमतीने पाहिले आहे. प्रत्यक्षात असं झालं नसेल असं म्हणत अनेक सोशल मीडिया युजर्सनी जुन्या घटनांचा उल्लेख केला आहे. दोन वर्षांपूर्वी मनसेने पोस्टर लावून एक पोलिस स्थानक चोरी झाल्याचे म्हटले होते. कारण त्यांच्या मते त्या पोलिस स्थानकात पोलिसांकडून समाधानकारक काम केलं जात नव्हते. तसाच काहीसा प्रकार घडला असावा, असं अनेक युजर्सना वाटतं.