Desi Jugad : सोशल मीडियावर अनेक लोक आपले टॅलेंट दाखवत असतात. असे अनेक व्हिडीओ थक्क करणारे असतात. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या सोशल मीडियावर कधी टॅलेंटेड लोकांचे; तर कधी जुगाड करणाऱ्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. सध्या असाच एका मुलीचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी स्टॅपलर पिन्सच्या मदतीने कार बनवताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, ही मुलगी स्टॅपलर पिन्सच्या मदतीने कारचे एक-एक पार्ट्स बनवते आणि नंतर हे पार्ट्स जोडते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या मुलीच्या टॅलेंटची सगळीकडे चर्चा आहे.

हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला फोटोमध्ये बेडूक दिसतो का? पण हा बेडूक नाही; एकदा क्लिक करून पाहा

आनंद महिंद्रा यांनी @anandmahindra या त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘फक्त स्टॅपलर पिन्सचा वापर करून तिला ही आयडिया कशी सुचली असेल? तिचे हे टॅलेंट अविश्वसनीय आहे; पण तिने आता खऱ्या कार मॅन्‍युफॅक्‍चरिंग आणि डिझाइनमध्ये काम करायला हवे. आम्ही तिला हायर करायला तयार आहोत.’

हेही वाचा : सिंहांची दहशत! जंगल सफारी करणाऱ्या वाहनांचा केला रस्ता ब्लॉक, पाहा रस्त्याच्या मधोमध झोपलेल्या सिंहांचा व्हिडीओ

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक युजर्स या मुलीच्या टॅलेंटचे कौतुक करीत आहेत. एका युजरने लिहिले, ‘अप्रतिम’; तर एका युजरने लिहिले, ‘अशा टॅलेंटेड लोकांची भारतात कमी नाही. फक्त या लोकांना समोर आणण्याची गरज आहे.’ आणखी एका युजरने आनंद महिंद्रा यांच्या टॅलेंट ओळखणाऱ्या दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman anand mahindra tweets a video of a woman made a car just using stapler pins jugad video goes viral ndj
Show comments