देशात खूप कमी लोक सापडतील ज्यांना पाणीपुरी आवडत नाहीत. पुच्का, पाणीपुरी आणि इतर अनेक नावानी ओळख असणारा हा पदार्थ. मसालेदार बटाट्याचे स्टफिंगने भरलेले आणि चटपटा चिंच किंवा पुदिन्याच्या पाण्यात बुडलेली ही कुरकुरीत पुरी संध्याकाळी झटपट नाश्त्यासाठी अनेकांना आवडतात. तथापि, या लोकप्रिय पाणीपुरीचा एक वेगळाच प्रकार बघून नेटिझन्सन गोंधळले आहेत. बटर चिकन पाणीपुरी अशी कॉकटेल डिशचा फोटो सगळेच हैराण झाले आहेत.

कशी आहे ही पाणीपुरी?

देवलिना या नावाच्या ट्विटर हॅडेलवरून या हटके डिशची झलक दिली. पोस्टमध्ये समाविष्ट केलेला फोटो फूड डिलीव्हरी आउटलेटमधील बटर चिकन पाणीपुरीचा होता. त्यात दिसत आहे की पाणीपुरीमध्ये चिकनचे स्टफिंग भरलेले आहे आणि वरून शेव टाकलेली आहे.

नेटीझन्सची प्रतिक्रिया

पोस्टला अनेक पसंती आणि प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत आणि हे स्पष्ट होते की नेटीझन्सना हा पाणीपुरीचा प्रकार अजिबात आवडलेला नाही. अनेकांनी पाणीपुरी जशी असते तशीच खाण्यास सांगितली तर काही जण म्हणले की, ” हा पाणीपुरीचा प्रकार रस्त्यालगतच्या स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीला कधीच हरवू शकत नाही.

तुम्हाला आवडेल का ही बटरचिकन पाणीपुरी ट्राय करायला आवडेल का?

Story img Loader