सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काय करतील याचा नेम नाही. कधी डान्स करतात कधी स्टंट करतात तर कधी फुड व्हि़डीओ पोस्ट करतात. खाद्यपदार्थांच्या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळते. अनेकदा लोक प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रसिद्ध खाद्यपदार्थ तयार करण्याच्या रेसिपी असे व्हिडीओ पोस्ट करतात. अनेकदा लोक खाद्यपदार्थांवर अनेक प्रयोग करतात. कधी मॅगी पराठा, गुलाबजाम पराठा असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मिडियावर वापरकर्ते ऑनलाइन फिरत असलेल्या विचित्र फूड ट्रेंडमुळे कंटाळले आहेत आणि आता ‘या’ यादीत बटर-फ्राईड पाव आइस्क्रीम हा पदार्थ देखील समाविष्ट झाला आहे.
पाव हा अनेक लोकांना खायला आवडतो. पाव हा अनेक पदार्थांबरोबर आवर्जून वापरला जातो. वडापाव, मिसळपाव, पावभाजी असे कित्येक पदार्थ पावाशिवाय अपूर्ण आहेत. इंस्टाग्रामवर foodie_mayur_official नावाच्या पेजवर एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. गुजराती फूड व्लॉगरन मयूर त्रिवेदी याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हि़डीओमध्ये, चक्क पावमध्ये आइस्क्रीम लावले आहे आणि नंतर मोठ्या प्रमाणात बटरमध्ये पाव तळलेला आहे.
हेही वाचा – लग्नसोहळ्यात कारच्या सनरुफमध्ये उभे राहून सुरु होती आतशबाजी, पुढच्या क्षणी फटाके…..Viral Video
गुजरातीमध्ये कॅप्शनसह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या त्रिवेदी यांनी हे स्पष्ट केल्याचे सुनिश्चित केले.”हे सर्व मजेदार होते “व्हिडिओ फक्त टाइमपाससाठी बनविला गेला आहे,हा पदार्थ प्रत्यक्षात विकला जात नाही.” त्याने पुष्टी केली की,”ही असामान्य निर्मिती तुम्हाला कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये सापडणार नाही—केवळ मनोरंजनासाठी एक विलक्षण प्रयोग.”
.व्हिडिओवर व्लॉगरचे स्पष्टीकरण असूनही व्हिडिओ चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
व्हिडिओला प्रतिसाद देताना एका युजरने कमेंट केली, “बंधु आणि भगिनींनो, सर्व गुजराती समाजातर्फे मी माफी मागतो.” दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले, “गुजरातमधील खाद्यपदार्थ विक्रेत्याने दिलेल्या अन्नावर चीज न टाकल्याचे अत्यंत दुर्मिळ दृश्य. अत्यंत दुर्मिळ. ते चहा आणि कॉफीमध्येही चीज किसून खातात.”
तिसऱ्या व्यक्तीने लिहिले, “चीज किंवा मेयो पण टाका,” आणि दुसऱ्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने कमेंट केली, “ हे खाण्यापेक्षा मी उपाशी राहीन