Viral Video : बॉलीवूड सिनेस्टार लोकांना भेटणे, अनेक चाहत्यांसाठी स्वप्न असते. अनेक जण त्यांच्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला भेटण्यास उत्सूक असतात. काही लोक संग्रहालयात त्यांची इच्छा पूर्ण करतात जिथे प्रसिद्ध लोकांसह सिने अभिनेते आणि अभिनेत्रींचे मेणाचे पुतळे उभारले जातात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला जेव्हा करीना कपूरचा पुतळा पहिल्यांदा बघते, तेव्हा ती असं काही करते की तुम्हीही पाहून थक्क व्हाल.
मेकअप आर्टिस्ट निर्मला मोहन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून तिची आई जेव्हा करीना कपूरचा पुतळा पहिल्यांदा बघते, तेव्हा आईची प्रतिक्रिया काय असते, हे कॅमेऱ्यात कैद केले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की निर्मला मोहनची आई जेव्हा करीना कपूरच्या पुतळ्यासमोर जाते तेव्हा तिची नजर पुतळ्याच्या पोशाखावर जाते आणि पुतळ्याला परिधान केलेल्या कपड्याला ती नीट करते. त्यानंतर ती करीना कपूरच्या पुतळ्याबरोबर फोटो काढते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा : VIDEO: पठ्ठ्याने फ्रिज, कूलरच्या मदतीने केला देशी जुगाड; थंडगार हवेसाठी आता AC लाही जाल विसरून
nirmala_makeupartistry या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” मॅडम तुसाद संग्रहालयात करीना कपुरला भेटल्यानंतर माझ्या आईची प्रतिक्रिया” महिलाच्या या कृत्यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आई ही आई असते” तर एका युजरने लिहिलेय, “मला वाटले खरंच करीना कपूर आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “निष्पाप आयांची ही शेवटची पिढी” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी भारतीय आईंवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.