Cab Driver Viral Video : भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या ट्रकच्या मागे लिहिलेल्या शायरी वर्ल्ड फेमस आहेत. यात मुलगी शिकली प्रगती झाली, बघतोयस का रागाने अशाप्रकारची मराठी मेसेज देखील फेमस आहेत. पण बदलत्या काळानुसार आता वाहन चालकांनी सामाजिक विषयांवरील मेसेज लिहण्यास सुरुवात केली आहे. पण केवळ ट्रकवरच नाही तर आता कार आणि बाईक चालकांनी देखील बेबी ऑन बोर्ड, हारे का सहारा, मम्माज बॉय, असे अनेक लिहिलेले स्टीकर पाहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण काही लोक गाडीवर अशा काही गोष्टी लिहितात, जे वाचल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल. सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जे वाचल्यानंतर इन्स्टाग्राम युजर्स म्हणाले की, भावा एकदम खरी गोष्ट लिहिली आहे.

हेही वाचा – मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावून आला ‘सनीभाई’; VIDEO तील जर्सी नंबर पाहून भारावले नेटिझन्स, म्हणाले, ‘अरे हा तर…’

२०२४ मध्ये मुलगी नाही, बेरोजगार…

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक वॅग्नआर कॅब रस्त्यावरुन जात आहे. यावेळी मागच्या कारमध्ये बसलेला व्यक्ती त्या कॅबवरील मेसेज झूम करुन बोलतोय की, भावाने काय एकदम खरी गोष्ट लिहिली आहे. यानंतर तो कॅबच्या काचेवरील मेसेज वाचतो, २०२४ मध्ये मुलगी नाही तर बेरोजगार मुलं आई -वडिलांसाठी ओझे आहेत

हा व्हिडिओ @trekkeryatty या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, तो मोठा होऊन काय बनेल, तो जगाशी स्पर्धा कशी करू शकेल. अशाप्रकारे अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, कॅब ड्रायव्हर नाही, तर तो मुलांच्या वेदना समजू शकतो. दुसरा युजरने लिहिले की, मनापासून सलाम. तर इतरांनी लिहिले – कोणीतरी आहे ज्याला मुलांचे हाल समजतात….