रस्त्यात थुंकण्यास मनाई केली म्हणून एका तरुणीवर टॅक्सी चालकाने अश्लील शेरेबाजी केली. प्रभादेवीवरून लोअर परेलच्या दिशेने निघालेल्या या मुलीचे टॅक्सी चालकासोबत संभाषण सुरू होते. सुरूवातीला चांगल्या चाललेल्या या संवादाने मात्र नंतर अश्लील टोक गाठले. गुटखा खात असलेला हा टॅक्सी चालक रस्त्यात थुंकला त्यामुळे या मुलीने त्याला असे न करण्यास सांगितले. तेव्हा ‘मी तर रस्ता घाण करतो, पण तुम्ही मुली मुलांसोबत झोपून समाज घाण करता’ अशाप्रकारची अश्लिल शेरेबाजी तिच्यावर केली. ही मुलगी टॅक्सीमधून उतरल्यानंतर अशाप्रकारची शेरेबाजी करत चालकाने तिथून पळ काढला.
या मुलीने त्यानंतर घडलेला सारा प्रसंग फेसबुकवर पोस्ट केला आणि सोशल मीडियावर हे प्रकरण चर्चेत आले. ही मुलगी टॅक्सीत बसून लोअर परेलच्या दिशेन जात होती. तेव्हा टॅक्सी चालक गुटखा चघळत होता तेव्हा आपण त्याला रस्त्यात थुंकू नये असे सांगितले. त्यावर आपण थुंकणार नाही असे टॅक्सी चालकाने कबुल केले पण नंतर पाचव्या मिनिटाला मात्र तो टॅक्सी चालक रस्त्यात थुंकला. या तरूणीने त्याला रस्त्यात थुंकल्यावर रोगराई होईल असे सांगितले मात्र त्याने काहिच प्रतिक्रिया दिली नाही. पण जशी ती टॅक्सीतून उरतली तेव्हा अश्लील शेरेबाजी करत त्याने तिथून पळ काढला. आपल्यासोबत जो प्रकार झाला तो इतरांसोबत होऊ नये यासाठी तयार रहा असेही या मुलीने फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे.