स्वतःचे एखादे हॉटेल, दुकान किंवा कॅफे सुरू करायचे असेल तर ते दुसऱ्यांपेक्षा किती आकर्षित आणि खास दिसेल या गोष्टींकडे सगळ्यात जास्त लक्ष दिले जाते आणि त्याची रचना करून घेतली जाते. काही जण पारंपरिक थीम ठेवून हॉटेल सजवतात, तर काही जण विविध वस्तूंनी कॅफे, दुकान सजवून घेतात. तर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दक्षिण कोरियातील एका कॅफेचा फोटो शेअर करण्यात आला आहे ; जे ट्रेनच्या डब्यांपासून बनवले आहे.
दक्षिण कोरियाच्या जेओंगसॉन (Jeongseon) मधील औराजी (Auraji) रेल्वे मार्गावरील गुजेओल-री (Gujeol-ri) रेल्वेस्थानकाजवळ हे कॅफे आहे. ‘द ग्राशॉपर्स ड्रीम कॅफे’ असे याचे नाव आहे. तसेच खास गोष्ट अशी की, हे कॅफे रेल्वेस्थानकावरच बनवण्यात आले आहे. तसेच हे कॅफे साधंसूधं नसून ट्रेनच्या दोन डब्ब्यांनी अगदीच खास पद्धतीत तयार केलं आहे. ट्रेनच्या दोन डब्यांचे अगदीच अनोख्या पद्धतीत कॅफेमध्ये रूपांतर केलं आहे. एकदा तुम्हीसुद्धा हे हटके कॅफे पोस्टमधून बघा…
पोस्ट नक्की बघा :
अनोखा कॅफे तयार करण्यासाठी दोन जुन्या ट्रेनच्या डब्यांचा पुन्हा वापर केला आहे आणि त्याला हिरवा रंग देण्यात आला आहे. तसेच या दोन्ही ट्रेनच्या डब्यांची रचना डबल-डेकरप्रमाणे करून घेतली आहे. तसेच कॅफेच्या आतमध्ये आणि पहिल्या मजल्यावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठीसुद्धा खास पायऱ्या तयार करून घेतल्या आहेत. रेल्वेस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी लाकडाचे छोटे बाक आहेत आणि याच्या शेजारी हे सुंदर कॅफे आहे, जे अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @gunsnrosesgirl3 या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे आणि ‘दक्षिण कोरियामधील कॅफे दोन ट्रेनच्या डब्यांचे बनलेले आहे’, असे कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे. पोस्ट पाहून एका युजरने ‘खूप मस्त थीम आहे’, अशी कमेंट केली आहे; तर ट्रेनच्या डब्याचे कॅफेमध्ये रूपांतर केलेले पाहून अनेक जण कलाकाराची प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.