Delhi Cafes Hiring Girls to Scam: Bumble डेटिंग अॅपवर भेटलेल्या एका तरुणीसह डेटवर गेलेल्या दिल्लीस्थित एका पत्रकाराची फसवणूक झाल्याचे समजतेय. या तरुणींसह डेटवर गेल्याने या पत्रकाराला तब्बल १५,००० रुपयांचा फटका बसला होता. याविषयी पत्रकाराने माहिती देत सांगितले की, एका मुलीने त्याच्याशी संपर्क साधला आणि राजौरी गार्डनमध्ये भेटण्यास सांगितले. त्याने त्या महिलेला होकार दिला आणि नंतर तिने त्याला एका बारमध्ये नेले आणि स्वतःसाठी काही ड्रिंक्स ऑर्डर केली. आश्चर्य म्हणजे मोजक्या काही ड्रिंकचे बिल जेव्हा आले तेव्हा ते तब्बल १५, ८८६ रुपये होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘X’ वापरकर्ता अर्चित गुप्ता याने याविषयी माहिती शेअर करत लिहिले की, “बिल भरल्यानंतर, ती तरुणी मी माझ्या भावाला भेटून येते असे सांगत बारमधून निघून गेली आणि त्यानंतर ती परतलीच नाही. तेव्हा समजले की या तरुणीने आपली फसवणूक केली आहे. १० नोव्हेंबर २०२३ ला सदर प्रकार घडला.” फसवणूक झालेला २५ वर्षीय पत्रकार अविवाहित होता. Bumble वर आपण जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत होतो असेही त्याने म्हटले. या प्रकरणार सायबर पोलिसांतर्फे काही मदत झालेली नाही तरी आता दिल्ली पोलिसांनी तरी मदत करावी अशी विनंती सुद्धा या पोस्टच्या कॅप्शनमध्ये करण्यात आली आहे.

Bumble वरून डेटवर गेला आणि १५ हजाराला चुना

हे ही वाचा<< दिवाळीला लोकांनी गूगलवर शोधले ‘हे’ ५ प्रश्न; सुंदर पिचाई यांची GIF पोस्ट, टीम कूक यांनीही दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दरम्यान, अशा घटना केवळ राजधानीतच नाही तर इतर अनेक राज्यांमध्येही घडल्या आहेत. अनेकांनी याविषयी तक्रार सुद्धा केली आहे. काही असे हॉटस्पॉट्स आहेत जिथे अशा प्रकारे डेटच्या नावे गंडवण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. याविषयी पोलिसांनी सक्रिय तपास करायला हवा. काहींनी तर हा प्रकार बार व पबच्या मालकांकडून केला जात असावा अशीही शक्यता कमेंट्समध्ये वर्तवली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cafes hiring girls to scam journalist duped by woman he met on bumble lost 15 thousand why is it threat to single man svs