Viral News: मे महिना नुकताच काही दिवसांपूर्वी संपला असला तरी मे महिन्यासारखे कडाक्याचे ऊन मात्र अजूनही कमी झालेले नाही. कधी एकदाचा पाऊस पडतोय याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. या उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होतेय. या कडक उन्हातून प्रवास करताना जीव अगदी नकोसा होतो. दरम्यान, सध्या नुकताच एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यात घरात चोरी करायला आलेला चोर उकाड्याला वैतागून चोरी न करता, त्याच घरातील एसीच्या हवेत झोपलेला दिसत आहे. हा फोटो सध्या खूप चर्चेत असून, त्यावर युजर्सही अनेक मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर किस्से, व्हिडीओ, फोटो व्हायरल होताना आपण पाहतो. त्यामध्ये कधी कोण काय करेल हेही सांगता येत नाही. नुकताच काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा एक व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाला होता; ज्यात त्याने भरउन्हात गाडीवर बसून अंघोळ केली होती. दरम्यान, आता व्हायरल होणाऱ्या फोटोत उकाड्याला वैतागलेला चोर दिसत आहे; त्याला पाहून तुम्हालाही हसू येईल.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
There will be investigation into bogus crop insurance case says Devendra Fadnavis
तर पीक विम्याच्या बोगस प्रकरणाची सखोल चौकशी- देवेंद्र फडणवीस
Police arrested three men for killing young man on Tuljaram College Road Baramati
बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड
MIDC police Thane, woman petrol pump director threatened, MIDC police Thane range,
उपराजधानीत गुंडगिरीचा कळस, भीतीपोटी पेट्रोलपंप चालक महिलेचे गुंडांच्या पायावर लोटांगण… व्हिडीओ व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
pune crime news
पुणे : प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुंडासह साथीदार गजाआड
pimpri murder of youth marathi news
पिंपरी : बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडरची टाकी डोक्यात घालून खून

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखनऊ येखील इंदिरा नगरमधील असून, एक चोर येथील एका घरात चोरी करण्यासाठी घुसला होता. घरातील काही मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्यानंतर चोराला उकाडा जाणवू लागला. त्यामुळे तो एसी सुरू करून तिथेच झोपी गेला. त्यावेळी त्या घराच्या शेजारील घरातील महिलेला बाजूच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे तिला शंका आली आणि तिने तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिस घटनास्थळी उपस्थित झाल्यावर त्यांना घरातील वस्तू इकडे-तिकडे पडलेल्या दिसल्या. कपाटातील सामानदेखील अस्तव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी त्यांची नजर खाली झोपलेल्या चोराकडे गेली. हा चोर चोरी केलेले सामान एका बॅगेत भरून जमिनीवर शर्ट काढून आरामात झोपलेला दिसला. त्यावेळी त्या चोराला पोलिसांना जागे करून अटक केली.

हेही वाचा: पुणेरी पाटीला टाकलं मागे; पर्यटकांना धमकी वजा इशारा देणाऱ्या फलकाचा PHOTO पाहून तुम्हीही व्हाल हसून लोटपोट

पाहा व्हिडीओ:

या चोराचा फोटो X (ट्विटर)वरील @Ashu Patel या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये, ‘खूप उकाडा आहे. हा चोर लखनऊच्या एका घरामध्ये चोरी करण्यासाठी शिरला होता; पण उकाड्याला वैतागून त्याने एसी सुरू केला आणि झोपी गेला. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याला उठवलं. त्याला आता अटक केली असून, तो अजूनही उकाड्याला वैतागलेला आहे.’ या पोस्टवर आतापर्यंत जवळपास बऱ्याच व्ह्युज मिळाल्या असून, अनेक जण कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.

Story img Loader