Viral Video : फुलपाखरू ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. अनेकदा बागेत फुलांवर दिसते तर कधी आपल्या घराच्या खिडकीत येते. त्या फुलपाखराला उडताना पाहण्याचा आनंद गगनात मावेनासा असतो.

पण तुम्हाला माहीत आहे का कागदी फुलपाखरू सुद्धा उडते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. कागदापासून तयार केलेले फुलपाखरू सुद्धा उडते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे फुलपाखरू कसे तयार करतात, आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कागदी फुलपाखरू कसे तयार केले जाते, हे दाखवले आहे. (can really butterfly made from paper fly watch how to make non stop flying paper toy video viral)

हेही वाचा : “जगात पैसा आहे फक्त तो कमवता आला पाहिजे” पुण्यातील हॉटेल बाहेरील जाहिरातीचा Video पाहून लोक म्हणाले, “पुढच्या वर्षीची बुकिंग…”

कागदापासून तयार केलेले फुलपाखरू सुद्धा उडते!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक चिमुकला फुलपाखरू उडवताना दिसत आहे. फुलपाखरूला उडताना पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की ते फुलपाखरू कागदापासून तयार केलेले आहे पण हे खरंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये पुढे तुम्हाला कागदी फुलपाखरू कसे तयार केले जाते, हे स्टेप बाय स्टेप दाखवले आहे. अगदी छोट्या कागदाचा वापर करून तुम्ही कागदी फुलपाखरू तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

banswarr या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अतिशय सुंदर असे उडणारे फुलपाखरू”

हेही वाचा : “एवढं प्रेम करणारा नवरा..” नवऱ्यानं बायकोसाठी बाईकच्या मागे लिहला खास मेसेज; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून खूप छान वाटले.” तर एका युजरने लिहिलेय, “मी हे करून पाहिले, पण माझे फुलपाखरू उडत नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझे फुलपाखरू उडाले, त्याला फक्त थोडी हवेची गरज असते” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही लोकांना व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण आली आहे. एका लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केलेला आहे.