Fact Chack : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वाघ चक्क माणसासारखा बसलेला दिसत आहे. खरंच वाघ माणसासारखा बसू शकतो का? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेऊया
लाईटहाऊस जर्नालिज्मला माणसासारखा बसलेल्या वाघाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असल्याचे लक्षात आले. या व्हिडीओमध्ये हा वाघ फिनिक्स प्राणिसंग्रहालयातील असल्याचा दावा करण्यात आला आहे जिथे वाघ माणसासारखा बसलेला दिसत होता. याशिवाय काही पोस्टमध्ये वाघाला गोळ्या झाडून ठार मारण्यात आल्याचा दावाही करण्यात आल्याचे समोर आले.
याविषयी जेव्हा लाईटहाऊस जर्नालिज्मने तपास केला तेव्हा त्यांना असे लक्षात आले की हा व्हिडिओ एआय (AI) निर्मित आहे. आणि या व्हायरल व्हिडीओद्वारे करण्याता आलेले सर्व दावे खोटे आहेत.
काय होत व्हायरल?
इंस्टाग्राम यूजर Hey Bawa ने वाघ माणसासारखा बसल्याचा दावा करत सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता आणि त्यानंतर हा व्हिडीओ डिलिट केला.
https://www.instagram.com/reel/C9hY2T7P-t2/?utm_source=ig_web_copy_link
या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन बघा.
इतर युजर्स सुद्धा हाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.
हेही वाचा : “फक्त क्लास १ अधिकाऱ्यांसाठी” सरकारी कार्यालयातील शौचालयातील ‘तो’ PHOTO पाहून युजर्सचा संताप; म्हणाले, “इंग्रज…”
तपास :
फिनिक्स प्राणिसंग्रहालयातील वाघ माणसासारखा बसला असल्याच्या काही बातम्या आहेत का, हे लाईटहाऊस जर्नालिज्म सर्वप्रथम तपासले. त्यांना त्याबद्दल कोणताही पुरावा सापडला नाही.
फिनिक्स प्राणिसंग्रहालयातील वाघाबद्दलची शेवटची बातमी अशी होती की प्राणिसंग्रहालयाने राजा नावाच्या नवीन सुमात्रन वाघाचे स्वागत केले होते.
https://www.abc15.com/entertainment/events/phoenix-zoo-welcomes-new-sumatran-tiger
आम्हाला फिनिक्स प्राणीसंग्रहालयाच्या वेबसाइटवर या वाघाविषयी कोणीतीही माहिती दिसून आली नाही.
वाघ माणसासारखा बसू शकत नाही त्यामुळे लाईटहाऊस जर्नालिज्मला यावर तपास करावा लागला. तुम्ही व्हिडीओ पाहिला असेल तर व्हिडिओ हा अतिशय स्पष्ट होता पण वाघाच्या हालचाली थोड्या विचित्र होत्या. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की या व्हिडीओमध्ये एआयचा वापर केला जाऊ शकतो
त्यानंतर लाईटहाऊस जर्नालिज्मने IIT जोधपूरच्या सहकार्याने बनवलेल्या AI डिटेक्टर itisaar.ai चा वापर करत व्हिडीओ तपासला तेव्हा हा व्हिडीओ बनावट असल्याचे समोर आले.
निष्कर्ष:
फिनिक्स प्राणिसंग्रहालयात वाघाचा माणसासारखा बसलेला व्हायरल व्हिडिओ हा खोटा आहे. हा व्हायरल व्हिडिओ AI निर्मित असून या व्हिडीओवरुन केलेले सर्व दावे खोटे आहेत.