अनेकांना रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गुटखा, तंबाखू खाण्याची सवय असते. हळूहळू त्यांची ही सवय नियंत्रणाबाहेर जाते, त्यामुळे ते तंबाखूशिवाय काही तासदेखील राहू शकत नाहीत. अशा लोकांच्या तोंडात नेहमी गुटखा, तंबाखू असतो. परंतु रोज तंबाखू, गुटखा खाण्याच्या सवयीमुळे काही वर्षांनी संबंधित व्यक्तीला तोंड उघडण्यासही त्रास होतो. अनेकदा ती व्यक्ती तिखट गोष्टी खाऊ शकत नाही. पण, असे का होते यावर दंत चिकित्सक डॉ. अलका खाडे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी तंबाखू खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतात आणि त्याचे कॅन्सरमध्ये कसे रुपांतर होते हे सांगितले आहे.

तंबाखूच्या सेवनाने तोंड का उघडत नाही?

डॉ. अलका खाडे यांच्या माहितीनुसार, जर एखादी व्यक्ती खूप वर्ष म्हणजे १० ते २० वर्षांपासून तंबाखू खात असेल तर त्याला कालांतराने तोंड उघडण्यास त्रास होतो. त्यामागचे कारण म्हणजे गालाच्या आतील जे मसल्स पॅड असतात ते आकुंचित पावतात, ज्यामुळे पेशंटला अतिशय त्रास होत असतो. असा रुग्ण जेव्हा रुग्णालयात येतो, तेव्हा डॉक्टर त्याच्या गालाच्या आतील जे मसल्स पॅड बोटाने चेक करतात, तेव्हा ते खूप जाडसर झाल्याचे जाणवतात.

यावेळी अनेक रुग्णांना सब म्युकस मायक्रोसिस झाल्याचे समजते. जी एक प्री-कॅन्सरची स्टेप मानली जाते.त्यामुळे वारंवार तंबाखूचे सेवन करु नका असे सांगितले जाते.

तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम

१) तंबाखूमुळे तोंड उघडण्यास त्रास झाला तर डॉक्टरांना दातांची ट्रिटमेंट करता येत नाही.

२) तोंड न उघडल्यामुळे रुग्णाला अन्न किंवा साधा लाडूदेखील खाताना त्रास होतो. अनेक रुग्णांना हे तंबाखू खाल्ल्यामुळे झालं हे देखील माहीत नसते.

Story img Loader