दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं! ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. याचा अर्थ असा की, की “जे आपल्याला दिसत तेच खरं असत असा नाही.” सहसा ही लोकांच्या वागण्याबाबत संदर्भ देताना वापरली जाते सध्या या म्हणीचा अर्थ दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पक्षी किंवा पक्ष्याची आकृती दिसेल पण येथे खरंच दिसतं तसं नाहीये
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्हाला एखादा पक्षी दिसत आहे. पण जेव्हा कॅमरा पक्षाच्या जवळ जातो तेव्हा लक्षात येते ही हे ऑप्टिकल इल्यूजन आहे. म्हणजे तिथे पक्ष असल्याचा भास निर्माण होतो पण प्रत्यक्षात तिथे खेळणी आणि टाकाऊ वस्तूंपासून साकारलेली कलाकृती आहे. ही कलाकृती टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली होते. कलाकाराची ही अप्रतिम कला पाहून नेटकरी थक्क झाले आहे. अनेकांना डोळ्यावर विश्वास बसत नाही.
हेही वाचा – २० रूपयांच्या नोटवर रेखाटले श्रीकृष्णाचे सुंदर चित्र! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “आता ही नोट…”
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर marathiasmitaofficial नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना सांगितले की, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं! आयुष्यात देखील गोष्टी समजून घेतल्या तर गैरसमज होत नाहीत.”
हेही वाचा – “लालपरी नव्हे ही तर….”, Viral Video पाहून तुम्हीही कराल कलाकाराचे तोंडभरून कौतुक
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करून लिहिले की, “या कलाकाराला मानाचा मुजरा, खुप छान कलाकृती!”
दुसरा म्हणाला की, “या कलाकाराच्या कलेसाठी खूप खूप शुभेच्छा मनापासून सलाम राम राम कृष्ण हरी”
तिसरा म्हणाला की, “खूप छान कलाकारी”
चौथा म्हणाला की, “टाकाऊ वस्तूंपासून टिकावू, खूप चांगली कला”
पाचवा म्हणाला की, “खूप सुंदर, पहिल्यांदाच पाहिली ही कलाकृती”