बंगळूरु ही ‘आयटी सिटी’ म्हणून ओळखले जाते त्याबरोबर येथील वाहतूक कोंडीसाठीही ओळखले जाते. बंगळुरूमधील वाहतूक कोंडीसंबधीत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी कोणी वाहतूक कोडींमध्ये वाटाणे सोलताना दिसते तर कोणी बाईकवर बसून मिटिंग अटेडं करताना दिसते. बंगळुरूमधील लोक वाहतूक कोंडीचा सामना करत वर्क लाईफ सांभाळण्यासाठी नेहमी चर्चेत येत असतात. याची प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात वाहतूक कोंडीमध्ये ऑफिस मिटींग अटेंड करण्यासाठी भन्नाट जुगाड शेअर केला आहे.

व्हायरल फोटोमध्ये एका ट्रकमध्ये ऑफिस खुर्च्यां ठेवलेल्या दिसत आहे आणि त्यापैकी एका खुर्चीवर एक माणूस आरामात बसलेला दिसत आहे जो पाहून अनेकांना वाहतूक कोंडीमध्ये ही सेवा मिळाली तर अनेकांना ऑफिसची मिटिंग अटेंड करता येईल.

“कॉन्फरन्स रूम ऑन व्हील्स”चा हा जुगाड बंगळुरूमधील लोकांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “आपण त्यातून फायदेशीर व्यवसाय करू शकतो, परंतु त्याबद्दल विचार करायला हवा,” असे एका वापरकर्त्याने म्हटले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “जर हा पर्याय खरचं सुरु झाला तर कोणीही त्यांच्या मिटिंगसाठी उशीर करणार नाही.”

“हे खूप मजेदार आणि मनोरंजक आहे,” असे एका वापरकर्त्याने म्हटले, कारण इंटरनेटच्या एका भागात या पोस्टला “पीक बेंगळुरू मोमेंट” म्हणून घोषित केले गेले.

ही पोस्ट कामाच्या संस्कृतीवर आणि प्रवासाच्या दैनंदिन संघर्षांवर एक मजेदार भाष्य आहे. वाहतूक कोंडीमध्ये एखादी कंपनीची बोर्ड मिटिंग सुरू झाली तर आश्चर्च वाटणार नाही.

Story img Loader