आइसलँड हा देश विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटांचे चित्रिकरण या देशांत झाले आहे. त्याचप्रमाणे नयनरम्य देखावे, हिमाच्छदित पर्वतरांगा, ज्वालामुखी अशी अनेक वैशिष्ट्ये या देशाची आहेत. त्यामुळे येथील निसर्ग पर्यटकांना थक्क करून सोडतो, पण या देशाची आश्चर्यचकित करून सोडणारी आणखी गोष्ट आहे. ती म्हणजे या देशाची टपालसेवा. ती विशेष असण्याचेही कारणही तसेच आहे. कोणतेही पत्र योग्य त्या ठिकाणी पोहचवण्यासाठी पत्ता हा अतिशय आवश्यक आहे. जर पत्ता नसेल तर पोस्टमन पत्र अचूक ठिकाणी कसे पोहचवेल? पण या देशातल्या पोस्टमनला पत्र एखाद्या ठिकाणी पोहचवण्यासाठी पत्त्याची आवश्यक्यता भासत नाही. तरीही ही पत्रे ज्याची त्याला अचूक मिळतात. तुम्हालाही जरा आश्चर्य वाटले असेल पण हे खरे आहे म्हणूनच आइसलँडच्या टपालसेवेला जगातील सर्वेत्कृष्ट सेवा मानली जाते.
याचीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका पर्यटकाला आइसलँडमधील जोडप्याला पत्र पाठवायचे होते. परंतु त्याला पत्ता मात्र आठवत नव्हता. त्यामुळे त्याने पत्रांवर हे जोडपे जिथे राहते त्या भागाचा नकाशा काढला. तसेच त्याला या भागाबद्दल जे जे काही आठवते ते ते त्याने या पत्रावर चित्राद्वारे दाखवले. नंतर हे पत्र त्याने पाठवून दिले. कोणताही पत्ता नसताना फक्त त्याने काढलेल्या नकाशावरून हे पत्र त्या घरी पोहचले देखील. आइसलँडच्या एका छोट्याशा गावत एक मेंढपाळ जोडपे आपल्या तीन मुलांसोबत राहते. त्यांच्यासाठी या एका पर्यटकाने हे पत्र लिहले होते. एका व्यक्तीने ही गोष्ट सोशल मिडियावर टाकली त्यानंतर आइसलँड टपाल सेवेच्या अचूक सेवेचे कौतुक अनेकांनी केले आहे.
पत्ता नसतानाही अचूक पत्त्यावर पत्र पोहचले
या देशात पोस्टमनला पत्त्याची गरज लागत नाही
Written by लोकसत्ता टीम
![पत्ता नसतानाही अचूक पत्त्यावर पत्र पोहचले](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2016/09/letter.jpg?w=1024)
आणखी वाचा
First published on: 06-09-2016 at 14:08 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you believe this letter without an address reached its destination