सोशल मीडियावर रोज कित्येक खाद्यपदार्थांचे व्हिडीओ आपण पाहतो. खाद्यपदार्थांचे व्हिडीओला सहसा सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळते. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ लोकांना खायला आवडतात. आजकाल सोशल मीडियावर विचित्र खाद्यपदार्थांचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका विचित्र खाद्यपदार्थांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आईस्क्रिम राईस म्हणजेच आईस्क्रिम भात. सोशल मीडियावर सध्या आईस्क्रिम भातचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा गोड पदार्थ खाऊन दाखवण्याचे आव्हान दिले जात आहे.
आईस्क्रिम भात हा पहिल्यांदा चर्चेत आला नाही. यापूर्वी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने गर्लफ्रेंड चित्रपटात आईस्क्रिम भात खाताना दिसली होती. त्यावेळी देखील या विचित्र खाद्यपदार्थाची चर्चा झाली होती. हा आईस्क्रिम भात सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमुळे भात प्रेमी आणि आईस्क्रिम प्रेमी यांच्यामध्ये वाद पेटला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, व्हॅनिला आईस्क्रिममध्ये भात एकत्र करून खाताना दिसत आहे. काहीजण तांदळाची खीर किंवा राईल पुडिंगसह त्याची तुलना करत आहे.
खालील व्हिडिओ पहा:
हा वाद या खाद्यपदार्थाच्या चवीबद्दल नाही तर तर विविध संस्कृतींच्या स्वयंपाकाच्या पद्धतींबद्दल आहे, जिथे तांदूळ हे दही, दूध किंवा सूप सारख्या घटकांसह एकत्र केले जाते. नेटकऱ्यांनी काही मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यापैकी एक म्हणाला, “प्रामाणिकपणे ………….मला ते समजले.” दुसऱ्याने लिहिले, “थांबा, ही खरोखर चांगले असू शकते.”
पण, बरेच लोकांना या पदार्थाच्या चवीबद्दल शंका व्यक्ती केली. “एक आईस्क्रीम प्रेमी म्हणून, हे पूर्णपणे वाईट आहे,” असे एकाने सांगितले.