Check your IQ Level : ऑप्टिक इल्यूजनच्या फोटोंना समजणं प्रत्येक माणसासाठी सोपं नसतं. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधून काढण्यासाठी तल्लख बुद्धी असावी लागते. ज्या माणसांकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर असते, अशीच माणसं फोटोत लपलेल्या गोष्टी शोधून काढू शकतात. आताही सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा एक जबरदस्त फोटो व्हायरल झाला आहे. श्रीकृष्ण देवाच्या प्रतिमेत लपलेल्या १० बासरी फक्त १० सेकंदात शोधून काढण्याचं आव्हान लोकांना देण्यात आलं आहे. जी माणसं बुद्धीचा कस लावून ऑप्टिकल इल्यूजनची टेस्ट देतील, अशा लोकांनाच या प्रतिमेत असलेल्या बासरी शोधता येणार आहे. त्यामुळे या लोकांसाठी १० सेकंदाचा वेळ सुरु झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोटोत लपलेल्या १० बासरी शोधणं वाटतंय तितकं सोपं नाहीय. ऑप्टिकल इल्यूजनच्या या सुंदर फोटोत श्रीकृष्ण देवाच्या प्रतिमेत अनेक सुंदर गोष्टी दिसत आहेत. पण यामध्ये १० बासरी सुद्धा लपल्या आहेत आणि तुम्हाला या बासरींना शोधून दाखवायचं आहे. आता या बासरी शोधण्यात किती लोकांना यश मिळतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्यांच्याकडे तल्लख बु्द्धी आणि तीक्ष्ण नजरेनं पाहण्याची क्षमता आहे. अशी माणसं या टेस्टमध्ये पास होण्याची शक्यता आहे. पण ज्यांना या बासरी शोधण्यात अपयश आलं आहे. त्यांना आम्ही ऑप्टिकल इल्यूजनच्या या टेस्टचं अचूक उत्तर सांगणार आहोत.

इथे पाहा प्रतिमेत लपलेल्या बासरी

नक्की वाचा – फॅन असावा तर असा! व्हेंटिलेटरवर असतानाही शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट पाहिला, Video झाला व्हायरल

श्रीकृष्ण देवाची प्रतिमा बारकाईने पाहिल्यावर तुम्हाला यात असलेल्या बासरी नक्कीच दिसतील. पहिली बासरी तुम्ही श्रीकृष्ण देवाच्या हातात पाहू शकता. दुसरी बासरी पाठीमागच्या डोंगरावर आहे. तिसरी बासरी ढगांमध्ये लपली आहे. चौथी पक्षांच्या बाजूला आहे. पाचवी बासरी हरणाजवळ आणि सहावी झाडावर आहे. तसंच सातवी बासरी मागच्या महलावर आहे. आठवी झाडाच्या पानावर, नववी जमिनीवर आणि शेवटची दहावी बासरी देवाच्या जवळ आहे.