इंटरनेटचे जग खूप विचित्र आहे, इथे कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. कधी-कधी असे फोटो समोर येतात, जे पाहून आपल्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. काही फोटोमध्ये कोडं असते जे आपल्याला सोडवावे लागते त्यानंतरच त्याची मज्जा आपल्याला कळते. आजकाल असाच एक व्हायरल फोटो लोकांच्या बुद्धीची परीक्षा घेत आहे, जो पाहून बहुतेकांच डोकं चक्रावले आहे. खरंतर या फोटोत अनेक घुबडं एकत्र दिसत आहेत, मात्र या फोटोत चित्रात घुबडाशिवाय एक लबाड मांजर लपून बसले आहे, जे समोर असूनही लोकांच्या डोळ्यांना चकवा देत आहे. तुम्ही ही दुष्ट मांजर पाहिली आहे का?

पाहा फोटो

ऑप्टिकल इल्युजन फोटो अनेकदा आपल्या डोळ्यांना फसवतात. या फोटोंमध्ये लपलेले कोडं सोडवणारे फार कमी लोक आहेत, तर काही लोक आधीच या मनाला चकित करणाऱ्या ऑप्टिकल इल्युजन फोटोमुळे संभ्रमात पडले आहेत. आजच्या काळात, बहुतेक सोशल मीडिया वापरकर्ते या ऑप्टिकल इल्युजन फोटोंचे चॅलेज वेळेच्या मर्यादेत पूर्ण करण्यात इच्छूक असतात. तुम्हाला फक्त दिलेल्या वेळेत या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरचे कोडे सोडवायचे आहे.

हेही वाचा – खरे प्रतिबिंब ओळखा? पाण्यात दगड आहे की…. फोटो पाहून चक्रावून जाईल तुमचं डोकं

मांजर शोधा( फोटो- फेसबूक)
मांजर शोधा( फोटो- फेसबूक)

खरं तर, याफोटोच्या मदतीने तुम्ही तुमच्या मेंदूसाठी तसेच डोळ्यांसाठी एक छोटासा व्यायाम आहे. या ऑप्टिकल इल्युजन फोटोची पोस्ट फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक घुबड दिसतील, तुम्हाला फक्त १० सेकंदात या चित्रात लपलेली मांजर शोधायची आहे.

हेेही वाचा – ऐकावं ते नवलंच! झाडांना पाणी घालताना ‘टॉपलेस’ असते ‘ही’ महिला कारण….; लोक म्हणे, ”हा तर पब्लिसिटी स्टंट”

जर तुम्हाला अजूनही ही लपलेली मांजर सापडली नसेल, तर काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी हे कोडं देखील सोडवू शकतो. वर दर्शविलेल्या प्रतिमेत, लाल वर्तुळात घुबडांमध्ये लपलेली एक मांजर तुम्हाला दिसेल.

Story img Loader