ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात. गोंधळात टाकणारी चित्रे पाहून लोक चक्रवतात. कधी व्यक्तिमत्व चाचणी तर कधी चित्रात प्राणी शोधणे, अनेक प्रकारची चित्रे आपल्याला गोंधळात टाकतात. अशी चित्रे पाहिल्यानंतर लोकांना या चित्रातील कोडी सोडवण्यात मजा येऊ लागली आहे. यामुळेच आता ऑप्टिकल इल्युजन हा ट्रेंड बनला आहे. असेच आणखी एक चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये आपल्याला एका प्राण्याचा शोध घ्यायचा आहे.
काही दिवसांपूर्वी एका ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रातून पानांमध्ये एक साप सापडला होता, असेच आणखी एक चित्र सोशल मीडियावर समोर आले आहे, ज्यामध्ये आपल्याला पानांमध्ये एक सरडा शोधायचा आहे. या चित्रात तुम्हाला पानांमध्ये एक सरडा दिसेल, परंतु प्रथम तुम्हाला हे चित्र नीट पहावे लागेल. याचे कारण असे की हा सरडा आपल्या डोळ्यासमोर आहे, परंतु त्याचा आकार पूर्णपणे वेगळा आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये, सर्वप्रथम तुम्हाला पाने कोणत्या आकाराची आहेत हे पाहावे लागेल. जर तुम्हाला पानांचा आकार दिसला, तर तुम्ही सहज हा सरडा शोधू शकता.
मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू
ऑप्टिकल इल्युजन असलेल्या या चित्रात तुम्ही बारकाईने पाहिल्यास झाडांवरील सुकलेल्या पानांमध्ये सरड्याचा आकार दिसतो. जर तुम्ही सरडा पाहिला असेल तर तुम्हाला दिसेल की त्याचे तोंड, हात सुकलेल्या पानांच्या रंगाचे आहेत. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. हे चित्र पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.