Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असाच एक फोटो खूप चर्चेत आहे.ज्यामध्ये अनेक मानवी चेहऱ्यांमध्ये एक गोंडस मांजर लपलेली आहे. या मांजरीला शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहे. मात्र, असा दावा केला जात आहे की ९९ टक्के लोक या मांजरीला शोधण्यात अपयशी ठरले आहेत. चला तर मग बघूया तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत?
आम्हाला खात्री आहे की ही चेहऱ्यांमध्ये लपलेली मांजर शोधण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण हे चित्र बनवणाऱ्याने मांजरीला मानवी चेहऱ्याच्या मध्यभागी अशा प्रकारे लपवले आहे की लाखो प्रयत्न करूनही २० सेकंदात तिला शोधू शकणार नाहीत. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुमची दृष्टी तीक्ष्ण आहे, तर ते शोधा आणि मांजर कुठे आहे ते सांगा. तर तुमची वेळ आता सुरू झाली आहे. बघूया तुला मांजर दिसलं का?
( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेले शब्द वाचण्यात ९९% लोकं ठरले अपयशी; तुम्ही शोधू शकता का?)
तुम्हाला मानवी चेहऱ्यांमध्ये लपलेली मांजर दिसली का?
ऑप्टिकल इल्युजनसह हे चित्र पहा. तुम्हाला लोकांची गर्दी हसताना दिसेल, या लोकांमध्ये एक मांजर देखील आहे. चेहऱ्यांचे स्वरूप एकमेकांसारखेच असल्याने, त्यांच्यामध्ये लपलेली मांजर पाहणे जवळजवळ अशक्य आहे. तुमची इच्छा असल्यास, आम्ही तुम्हाला मांजर शोधण्यात थोडी मदत करू शकतो. सर्वात मोठा इशारा हा आहे की मांजर माणसांसारखी बाहेर नाही आहे.
( हे ही वाचा; Optical Illusion: १३ सेकंदात या चित्रातील मांजर शोधा; ९९% लोक ठरले अपयशी)
हे लक्षात घेण्यासारखे आहे की अशा स्केचेसमध्ये कलाकार सहसा मध्यभागी किंवा कोपऱ्यात कुठेतरी गोष्टी लपवतात. आपण मांजर पाहू शकत नसल्यास, चित्राच्या मध्यभागी किंवा कोपऱ्यात शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे करताच, तुम्हाला लपलेली मांजरही लगेच दिसेल. आणि तरीही मिळत नसेल तर खाली आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
‘ती’ मांजर इथे लपली आहे
तुमचा भ्रमनिरास करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन निर्माण केले जातात आणि यामुळे गोंधळायला होते.