Political Latest News Update : सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. आता नुकतच इंटरनेटवर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत एकूण १४ लोक आहेत. एक व्यक्ती अशी आहे, जे देशातील महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्ही या व्यक्तीला ओळखून त्यांचं नाव सांगू शकता. सुरुवातीला तुम्हाला काही हिंट्स देण्यात येत आहेत. ही व्यक्ती ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना भारताचं हृदय म्हटलं जातं. लोक त्यांना प्रेमाने मामा असंही म्हणतात. आता तर तुम्ही ओळखलच असेल.
या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे?
फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला कळलच असेल की फोटोत दिसणारी व्यक्ती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत. हा त्यांचा खूप जुना फोटो आहे. त्यावेळी ते कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. मित्रांसोबत त्यांनी कॉलेजमध्ये काढलेला हा फोटा आहे. हमीदिया महाविद्यालयाला स्थापना झाल्यापासून ७५ वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान खूप खूश असल्याचं एका व्हिडीओत दिसत आहे.
इथे पाहा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा व्हिडीओ
चौहान यांनी या कार्यक्रमात गाण्याच्या माध्यमातून कविता सादर केली आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी एका गाण्याचे बोल गाताना म्हटलं की, ‘एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो…ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो..बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से…होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से…तुम जैसे मेहरबां का सहारा है दोस्तो.’ मुख्यमंत्री चौहान यांनी एक फोटो शेअर केला. १४ सहकाऱ्यांसोबत शिवराज सिंह चौहान असल्याचा खुलासा त्यांनी स्वत:च केला.