Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असाच एक चित्र खूप चर्चेत आहे. या चित्रात एक बरीच पुस्तके आहेत. या पुस्तकांमध्ये एक पेन्सिल लपलेली आहे. तिला तुम्हाला शोधायचे आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथे फोटो पाहा

या फोटोत तुम्हाला बरीच पुस्तके दिसतील. इतक्या पुस्तकांमध्ये एक पेन्सिलही दडलेली आहे. या फोटोमधील पेन्सिल शोधण्यापूर्वी, तुम्हाला मोबाइल फोनमध्ये १० सेकंदांचा टायमर सेट करावा लागेल. हा फोटो बारकाईने पाहिल्यास तुम्हाला योग्य उत्तर मिळण्याची शक्यता वाढू शकते.

( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेल्या मुलीला तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अपयशी)

उत्तर फोटोच्या तळाशी आहे

जर तुम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या तळाशी पेन्सिल शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पेन्सिल पाहिली असेल तर अभिनंदन, तुमचे डोळे खरोखरच तीक्ष्ण आहे. पण जर तुम्हाला बरोबर उत्तर मिळाले नसेल, तर खाली दिलेल्या फोटोत बघा पेन्सिल कुठे लपवली आहे हे तुम्हाला लगेच समजेल.

( हे ही वाचा: Optical Illusion: या फोटोमध्ये लपलेले किती चेहरे तुम्हाला दिसले? ९ सापडल्यास तुम्ही ठराल जिनियस)

फक्त १% लोक यशस्वी झाले

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिलेल्या वेळेत हे कोडे सोडवणारे खूप कमी हुशार लोक आहेत. हा फोटो अशा प्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की पेन्सिल तुम्हाला सहसा दिसणारच नाही. असे ऑप्टिकल भ्रम अनेकदा सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you see the hidden pencil in the middle of the book gps
Show comments