ऑप्टिकल इल्युजन हा सोशल मीडियावरील लोकप्रिय प्रकार अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यातील कोडी सोडवणे, दिलेले चॅलेंज पुर्ण करणे हा मनोरंजनासह विचार करण्याच्या क्षमतेला चालना देते असे मानले जाते. त्यामुळे दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशी ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवली जातात. असेच एक चित्र व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या चित्रामध्ये एक रूम दिसत आहे. जिथे एक माणूस पुस्तक वाचत बसला आहे, तर एक महिला वॅक्युम क्लीनरने स्वच्छता करत असल्याचे दिसत आहे. या चित्रामध्ये एकुण ११ चुका आहेत. तुम्हाला या ११ चुका ओळखता येतायत का पाहा.

आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…

फोटो:

आणखी वाचा- Viral: मास्कचा हा अनोखा जुगाड पाहिलात का? या माणसाच्या बुद्धीच नेटकऱ्यांनीही केलं कौतुक, चक्क जेवतानाही…

फोटोतील ११ चुका:

  • या चित्रात दिसणाऱ्या माणसाने एका पायात बूट आणि दुसऱ्या पायात चप्पल घातली आहे.
  • घराबाहेर गार्डनमध्ये दिसणारी गाजरं जमिनीवर उगवली आहेत.
  • घड्याडातील अंक चुकीची लिहिली आहेत.
  • माणूस बसलेल्या सोफ्याचा एक पाय गायब आहे.
  • फ्रिजमध्ये झाडू ठेवण्यात आला आहे.
  • कॅलेंडरमध्ये जून महिन्याचे ३१ दिवस दाखवण्यात आले आहेत, पण जून महिना हा ३० दिवसांचा असतो.
  • वॅक्युम क्लीनर कोणतीही पॉवर सप्लाय वायर जोडण्यात आलेली नाही.
  • खिडकीमध्ये बाहेर रात्र तर दरवाजातून बाहेर दिवस असल्याचे दिसत आहे.
  • सिंक खाली असणाऱ्या दाराला आतल्या बाजुने हॅन्डल आहे.
  • कॅलेंडर खाली असणाऱ्या कप्प्याला हॅन्डल दिलेले नाही.
  • सिंक खाली पुस्तकांसाठी कपाट बनवण्यात आले आहे.

Story img Loader