सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींपैकी ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार सध्या आवडीचा झाला आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या फोटो किंवा चित्रातील कोडी सोडवणे अनेकांना ताण कमी करण्यासाठी मदत करते, तो अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे मानले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यातील चॅलेंज जाणून घ्या.
व्हायरल होणाऱ्या या चित्रामध्ये काही झाडं, एक घर आणि झाड तोडण्याचा प्रयत्न करणारा एक माणूस दिसत आहे. पण या चित्रामध्ये एक चुक आहे, ती चुक काय आहे ते ओळखण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला ती चुक ओळखता येतेय का पाहा.
आणखी वाचा: वऱ्हाडासाठी बुक केले संपूर्ण विमान; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं
फोटो :

फोटोमधील चुक तुमच्या लक्षात आली का? जर तुम्हाला चुक समजली नसेल तर पुढील फोटो पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.
आणखी वाचा: ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

या फोटोमध्ये झाड तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या हातात कुदळ आहे, जे चुकीचे आहे. कारणं झाड तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला जातो. या माणसाच्या हातात असणारी कुदळ या चित्रामधील चुक आहे.