Optical Illusion: लहानपणी आपण कोडी सोडवायचो. ही कोडी सोडवायला आपल्याला खूप मजा यायची. सुट्टीला आजोळी गेलं की एक ठरलेला कार्यक्रम असायचा, सगळी भावंडं गोळा झाली की कोड्यांची चढाओढ लागायची. एक जण कोडी सांगणार दुसरा ती सोडवणार. जो ते कोडं पटकन सोडवून दाखवेल तो सगळ्यात हुशार ठरायचा. जसजसा काळ पुढे सरकला कोड्यांचं स्वरूप बदललं. आता हीच कोडी ऑनलाइन आलीत. या कोड्यांना आता ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन हा एक प्रकारचा मेंदूचा व्यायाम आहे. ही कोडी इंटरनेट वर इतकी फेमस आहेत की लोकं रिकाम्या वेळेत ही कोडी सोडवत बसतात.
सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या चित्रात, तुम्हाला समान शब्दांमधील एक वेगळा शब्द शोधून काढायचा आहे, जो लोकांना गोंधळात टाकत आहे. निरीक्षण कौशल्य चांगली असणारी व्यक्ती अशा प्रकारची कोडी सहज सोडवू शकते. आता हेच चित्र नीट पहा…या चित्रातला फरक तुम्हाला सांगायचा आहे. इथे एक वेगळा शब्द आहे, जो तुम्हाला शोधावा लागेल.
फ्रेशर्सलाइव्हने तयार केलेल्या या आव्हानाचा तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंद घेऊ शकता. या कोड्यामध्ये, तुम्हाला DARK लिहिलेले दिसेल. फक्त आणि फक्त हाच शब्द प्रत्येक ओळीत दिसत असला तरी त्यात कुठेतरी वेगळा शब्द आहे, जो कोणाच्याही लक्षात येत नाही. तुमच्यासाठी आव्हान आहे ते शोधणे आणि पुढील १० सेकंदात ते दाखवणे.
पाहा कोडे
तुम्ही आव्हान पूर्ण करू शकलात का?
खरे तर रंगांच्या कॉन्ट्रास्टमुळे डोळे आणि मन गोंधळून जाते. तुम्ही आव्हान पूर्ण करू शकला आहाता का? नसेल तर आम्ही तुम्हाला शोधण्यास मदत करतो. जर तुम्हाला उत्तर सापडत नसेल, तर एक वेगळा शब्द म्हणजे PARK असा आहे. तुम्हाला हा वेगळा शब्द सापडला असेल तर अभिनंदन. मात्र, तुम्ही अजूनही तो शोधत असाल तर त्याचं उत्तर खाली दिलं आहे.