पावसाळ्यात लोणावळ्याला जायचा प्लॅन करताय? थांबा. जरा विचार करा… तुम्ही बिंधास्तपणे रेल्वे रुळावरून चालत आहात आणि तुमच्या समोर वाघ किंवा सिंहासारखे भयानक प्राणी येतात? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रेल्वे रुळावर मोकाट जनावरे कसे येतात? त्याचे खरे स्थान जंगलात आहे. आम्हीही हाच विचार करत होतो, पण नुकताच समोर आलेल्या एका व्हिडिओ पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. महाराष्ट्रातील लोणावळा येथील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल एवढं नक्की.
लोणावळ्याला फिरायला जाताय?
लोणावळ्यातील रेल्वे ट्रॅकवर वाघ आढळला असून हा व्हिडीओ पाहून सगळेच घाबरले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रेल्वे रुळावरून चालत असल्याचे दिसून येत आहे.आपल्यासमोर काय संकट येणार आहे याची त्याला अजिबात कल्पना नाही. ती व्यक्ती आपल्यातच मग्न होऊन चालत होती, तेवढ्यात पलीकडून एक वाघ धावत येतो. त्या व्यक्तीची नजर वाघावर पडताच त्याला घाम फुटतो. पुढे जाण्याऐवजी तो मागे पळू लागतो आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो.
दरम्यान सुदैवाने वाघाने माणसाला इजा केली नाही. तो त्याच्या वाटेनं निघून गेला . मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही लोकांनी तो वाघ नसून बिबट्या असल्याचा दावा केला. तर काही लोक हा प्राणी वाघ असल्याचा दावा करत आहेत. आता वाघ असो की बिबट्या, दोघेही जंगलातील भयानक प्राणी मानले जातात. त्यांचे माणसांमध्ये खुलेआम फिरणे हा चिंतेचा विषय आहे. कारण ते कोणाचेही नुकसान करू शकतात.
पाहा व्हिडीओ
@LonavalaTourism नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.प्राण्यांच्या दहशतीचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ कधी खूपच मनमोहक असतात, तर काही व्हिडीओ हे थरारक शिकारीचे असतात. गेल्या काही वर्षांमध्ये जंगल परिसरात पर्यटनांमुळे आपला वावर वाढल्यानंतर वन्यप्राणी अनेक वेळा रस्त्यावर येताना दिसतं आहे.