रोज तेच तेच नेहमीच काम करून तुम्हाला कंटाळा आलाय का? मग या कंटाळवाण्या कामातून थोडासा विरंगुळा म्हणून तुमच्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं घेऊन आलोय. सध्या सोशल मीडियावर चार मुलींचा फोटो व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल हा फोटो पाहून आम्ही काय कारायचं? हा फोटो पाहण्यात कसला आलाय विरंगुळा? पण हा साधासुधा फोटो नाहीय, या फोटोत काहीतरी वेगळं दडलंय आणि तुम्हाला ते शोधायचं आहे. आता या चार मैत्रिणी आणि मागे एवढी गर्दी दिसतेय त्याहून काय बरं वेगळं यात दडलं असेल असा विचार तुम्हीही करत असालच पण हीच तर खरी गंमत आहे. थोडं डोकं लढवलं तर वर वर ठिक वाटणाऱ्या फोटोतलं कोड तुमच्या लक्षात येईल.

वाचा : आठ वर्षांपूर्वी जिचा जीव वाचवला, तिनेच वाचवले त्या रिक्षाचालकाचे प्राण!

बरं अजूनही तुम्हाला या फोटोत काय वेगळं आहे हे लक्षात आलं नाहीय का? फार टेन्शन घेऊ नका हाती अपयश आलेले तुम्ही काही पाहिले नाहीत. या फोटोतलं वेगळपण ओळखायचं झालं तर ‘आयुष्य खर्ची पडेल पण उत्तर सापडणार नाही’ अशी उपरोधक ओळच या फोटोवर लिहिली आहे. तेव्हा तुम्हाला उत्तर न सापडण्याची अडचण आम्ही समजू शकतो. तेव्हा फार वेळ न दवडता आम्हीच तुम्हाला उत्तर सांगून टाकतो. तर या फोटोच्या मागे जी काही गर्दी दिसतेय त्याकडे नीट निरखून पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल हे सारे चेहेरे एकसारखेच आहेत. काय मग कसा वाटलं हे हटके कोडं तुम्हालाही ते आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रींणींसोबत नक्की शेअर करा.

VIDEO: दूध रस्त्यावर ओतण्याऐवजी मुलांना मोफत वाटले; शिर्डीतील तरुणाचा दिलदारपणा

Story img Loader