Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक चित्र खूप चर्चेत आहे. या चित्रात नऊ चेहरे लपलेले आहेत. जे ११ सेकंदात ओळखायचे आहेत. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच ११ सेकंदात हे नऊ चेहरे सापडले आहेत. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही या चित्रात दडलेले नऊ चेहरे शोधण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला ११ सेकंदात नऊ चेहरे दिसलेत का?
( हे ही वाचा: Optical Illusion: चेहऱ्यांमध्ये लपलेली मांजर तुम्ही शोधू शकाल का? ९९% लोकं ठरली अपयशी)
तुम्ही जे पाहत आहात ते फक्त झाडांचे सामान्य चित्र नाही आहे. या चित्रात एकूण नऊ चेहरे लपलेले आहेत आणि ११ सेकंदात सर्व चेहरे शोधण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे. बनवणाऱ्याने हे चित्र असे बनवले आहे की, फक्त १% लोकांना या चित्रात दडलेले चेहरे दिसले आहेत. या चित्रात दोन चेहरे लगेच दिसत आहेत, परंतु सर्व नऊ चेहरे शोधणे खूप कठीण आहे. हे चेहरे या चित्रात खोलवर लपलेले आहेत आणि फक्त एक उत्सुक निरीक्षकच ते सर्व चेहरे शोधू शकतात. तुम्ही आतापर्यंत किती चेहऱ्यांना शोधू शकलात?
चेहरे सहज ओळखणे फार कठीण आहे
या चित्रातील लपलेले चेहरे ओळखण्यासाठी चित्र नीट पहा. तुमच्यापैकी काहींनी आत्तापर्यंत पाच किंवा अधिक चेहरे पाहिले असतील. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांनी सातपेक्षा जास्त चेहरे पाहिले आहेत, तर तुम्ही कौतुकास पात्र आहात. काही चेहरे अशा प्रकारे ठेवण्यात आले आहेत की त्यांना ओळखणे खूप कठीण आहे. ज्यांनी सर्व चेहरे ओळखले त्याच्याकडे अत्यंत वेगवान मेंदू आणि उच्च दर्जाचे निरीक्षण कौशल्य आहे. ज्यांना शक्य झाले नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सर्व चेहरे पाहण्यासाठी खालील चित्र पहा.
( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेले शब्द वाचण्यात ९९% लोकं ठरले अपयशी; तुम्ही शोधू शकता का?)
तुमचा भ्रमनिरास करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन निर्माण केले जातात आणि यामुळे गोंधळायला होते.