Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असाच एक चित्र खूप चर्चेत आहे. या चित्रात एक मुलगी लपलेली आहे. तिला तुम्हाला शोधायचे आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.
वास्तविक, या चित्रात कोरडी झाडे, जंगले, पर्वत, झुडपे दिसत आहेत. हे चित्र अशा प्रकारे बनवण्यात आले आहे की त्यात एक दाढीवाला माणूस दिसतोय आणि त्याच्या आत एक रहस्य लपलेले आहे, म्हणजेच एक मुलगी चित्रात कुठेतरी लपून बसलेली आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेले हे चित्र स्विस चित्रकार सँड्रो डेल प्रीटे यांनी बनवले आहे.
( हे ही वाचा: शांत ज्वालामुखीमध्ये दगड फेकून माणसाने केली चूक; त्यानंतर झालेल्या उद्रेकाचा पहा हा भीतीदायक व्हिडीओ)
चित्रात लपलेली मुलगी तुम्हाला सापडली का?
जरी ऑप्टिकल इल्युजन असलेली काही चित्रे आहेत, ज्यामध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हे खुप कठीण असते. परंतु या चित्रात तसे नाही. जर तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला चित्रात लपलेली मुलगी दिसेल. यासाठी तुमची दृष्टी तीक्ष्ण असायला हवी आणि तुमचे मन एकाग्र असायला हवे, तरच तुम्ही हे आव्हान पूर्ण करू शकाल.
तुम्हाला अजूनही चित्रात लपलेली मुलगी दिसली नाही, तर आम्ही तुम्हाला काही हिंट देऊ शकतो. खरं तर, या चित्रात मुलगी बसलेली आहे आणि तिनेही गोल टोपी घातली आहे. आता आशा आहे की तुम्ही मुलगी सहज शोधू शकाल, पण तरीही जर तुम्हाला ती सापडली नसेल, तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. मुलगी या चित्राच्या अगदी मध्यभागी आहे. चित्रात दिसणार्या दाढीवाल्या माणसाचे नाक बघितले तर ती मुलगी तुम्हाला दिसेल.