सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. असाच एक बिबट्या आणि त्याचा बछडा लपलेला फोटो व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोत बिबट्या लपलेला आहे. तो शोधण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या डोळ्यांवर खूप जोर द्यावा लागतो आहे. फोटोतील बिबट्या शोधणे हे बहुतांशी लोकांना जमलं नाही आहे. मात्र, अनेक जण त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही देखील फोटोत असलेल्या बिबट्याला शोधलात तर तुमचा फोकस अप्रतिम आहे.

येथे फोटो पहा

कोलकाता येथील निसर्ग छायाचित्रकार धृतिमान मुखर्जी यांनी हा फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. फोटो काढण्याची वेळ एवढी अचूक आहे की, आई आणि बछडा टेकड्यांमध्ये इतके मिसळले आहेत की, प्रथमदर्शनी त्यांना शोधणे फार कठीण आहे. या फोटोत दोन्ही प्राण्यांना शोधण्यात तुम्हाला डोळ्यांची कसरत नक्कीच करावी लागणार आहे.

( हे ही वाचा: Optical Illusion: या फोटोत जिराफ लपला आहे, शोधताना भल्या भल्यांना फुटला घाम, तुम्ही शोधू शकता का?)

बिबट्या आणि बछडा येथेच लपले आहेत

फोटोत तुम्ही जर बारीक डोळ्यांनी टेकडीच्या अगदी मध्यभागी पाहिल्यास, तुम्हाला काही अंतरावर टेकडीच्या रंगात रंगवलेले दोन हिम बिबट्या दिसतील. चित्रात दोघेही उजव्या बाजूला धावण्याच्या स्थितीत उभे आहेत. हे चित्र पाहिल्यानंतर तुमचे डोके देखील चक्रावून गेले असेल, तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना देखील हे कोडे सोडवण्यास पाठवा.

Story img Loader