सोशल मीडियावर वन्यजीव दर्शवनारे विविध प्रकारचे फोटो व्हायरल होत असतात. सहसा, हे फोटो लोकांना प्रभावित करतात आणि कधीकधी आश्चर्यचकितही करतात. तथापि, काहीवेळा, असे काही फोटो व्हायरल होतात ज्यातले वन्यजीव शोधण एक आव्हान असत. अशा फोटोना अधिक पसंती दिली जाते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स २४/७ यांनी फेसबूकवर शेअर केलेला हा सापाचा जुना फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोन टेबल आहेत आणि त्यावर असलेले कुशन हे वेताच्या मटेरियलचे असल्यासारखे दिसत आहे. त्या दोन्ही कुशनवर काही मासिके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये साप कुठे दिसतो ते शोधा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video

आता हे दोन्ही टेबल आणि त्याखाली असलेली जमिन यावर सहजासहजी साप दिसणे कठीण आहे. जे हा साप शोधून काढतील त्यांना जास्तीचे पॉईंटस देण्यात येणार आहेत असेही या चित्राखाली म्हटले आहे. या चित्रातील साप शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला असून त्यावर विनोदी अशा प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. मात्र अद्याप अनेकांना हा साप नेमका कुठे आहे ते शोधता आलेले नाही. त्यामुळे पाहा बरं प्रयत्न करुन तुम्हाला हा साप शोधता येतो का ते…

आणखी वाचा : चक्क झाडावर शिकारीचा थरार! माकड आणि बिबट्याच्या लपंडावात कोण मारणार बाजी? पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा : या ३ अक्षराच्या मुली असतात भाग्यवान, लग्नानंतर ज्या घरात जातील तिथे होईल धनवर्षाव

हा फोटो २०१८ मधील ऑस्ट्रेलियाच्या निंदरी शहरातील एका घरातला आहे. यानंतर त्यांनी या प्रश्नाचे उत्तरही दिले आहे की हा साप कुठे होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you spot the snake in this viral photo dcp