ऑप्टिकल इल्यूजन तुमचे डोकं चक्रावून सोडतात. हे नेहमी लोकांना थक्क करतात. काही ऑप्टिकल इल्यूजन असे असतात जे समोर असूनही आपल्याला स्पष्ट दिसत नाही. सध्या असा एक ऑप्लिटकल इल्यूजन असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो लोकांना चक्रावून सोडत आहे. या फोटो चार मांजरीसंबधीत आहे जो नकळत डोळ्यांना फसवत आहे. या फोटोत तीन मांजरी दिसत आहे पण चौथी मांजर लपलेली आहे जी सहजा सहजी डोळ्यांना दिसत नाही. रेडिटवर शेअर केलेली हे आव्हान लोकांना चौथी मांजर शोधण्यास सांगते, त्यासाठी काही सेंकादाचा कालवधी दिला आहे.
Reddit वर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “या चित्रात ४ मांजरी आहेत.” पहिल्यांदा पाहिले, फोटोमध्ये तीन काळ्या मांजरी कॅमेराकडे टक लावून पाहत आहेत. पण, फोटोमध्ये चौथी मांजरही आहे.
हेही वाचा – रेखा जर बार्बी असती तर कशी दिसली असती? Myntra ने शेअर केले अभिनेत्रीचे सुंदर AI फोटो पाहून प्रेमात पडाल
आपण चौथी मांजर शोधण्यात यशस्वी झाले आहात का? की तुम्ही अजूनही उत्तर शोधण्यासाठी धडपडत आहात? Reddit यूजर्सच्या काही कमेंटवर एक नजर टाका जी तुम्हाला उत्तर शोधण्यात मदत करतील.
एका Reddit यूजरने शेअर केले, “मी आणखी काळी मांजर शोधण्याचा प्रयत्न करत होतो जी कदाचित त्या काळ्या मांजरींपैकी एकाच्या खाली किंवा त्याच्या शेजारी असेल.” दुसर्याने सुचवले, “मी काळ्या मांजरींवर झूम इन केले, नंतर झूम कमी केले आणि चौथे मांजर सापडले. “मला लक्षात आले की फ्रेमिंगने ती दिसत होते. काळ्या मांजरीच्या मधल्या अंतरावर चौथी मांजर मला अपेक्षित असलेल्या ओळीत आहे.”
तिसरा म्हणाला “येथे…चार…मांजरी आहेत!” आणखी एकाने विनोद केला, “हा तर कॅटमोफ्लॅग.”
हेही वाचा- हाताला खाज सुटल्याने पालटलं नशीब! ऑफिसला गेलेला मुलगा दीड कोटी घेऊन परतला, कसं ते वाचून व्हाल थक्क
या ऑप्टिकल इल्यूजने तुम्हाला थक्क केले का ? शेअर केल्यापासून, यास जवळजवळ १४ हजार लोकांनी पाहिले आणि या संख्येत वाढ होत आहे. या ऑप्टिकल भ्रमावर तुमचे काय मत आहे?