जगात शहरीकरणामुळे सगळीकडेच सिमेंट काँक्रिटची जंगले दिसू लागली आहेत. शहर म्हटले की अनेकांच्या डोळ्यासमोर सिमेंट काँक्रिटच्या उंचचउंच इमारती उभ्या राहतात. कारण शहर आणि सिमेंट काँक्रिटच्या इमारती हे जणू समीकरण बनून गेले आहे. मात्र कॅनडामध्ये या सगळ्याला अपवाद ठरेल, अशा इमारतीची उभारणी होते आहे. कॅनडात लाकडाची सर्वाधिक उंच इमारत उभारण्याचे काम अगदी जोरात सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लाकडापासून तयार करण्यात आलेली छोटी छोटी घरे अनेकांनी पाहिली आहेत. मात्र कॅनडात लाकडापासून सर्वाधिक उंच इमारत उभी राहते आहे. लाकडाची ही इमारत १८ मजल्यांची असेल. तर या इमारतीची उंची १७४ फुटांची असणार आहे. या इमारतीचे बांधकाम प्रस्तावित वेळेच्या चार महिने आधीच पूर्ण होणार आहे.

निसर्गाने दिलेल्या लाकडाचा आणि विज्ञानाने दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन सध्या या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ‘ही अनोखी इमारत जगातील अशा प्रकारची पहिलीच इमारत असेल. कॅनेडियन तंत्रज्ञानाचा हा एक उत्तम नमुना असेल’, अशा शब्दांमध्ये कॅनडाचे पर्यावरण मंत्री जिम कार यांनी या इमारतीबद्दल माहिती दिली आहे. ‘कॅनडाचा वन उद्योग नव्या संधींच्या शोधात आहे. अशा बांधकामांमुळे वन उद्योगाला नव्या संधी निर्माण होतील’, अशी आशा जिम कार यांनी व्यक्त केली आहे.

सध्या जगभरात उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये सिमेंट आणि काँक्रिटचा वापर केला जातो आहे. त्यामुळे जगभर काँक्रिटच्या जंगलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र कॅनेडात नेमका याउलट प्रयोग केला जातो आहे. त्यामुळे या इमारतीची चर्चा जगभरात सुरू आहे. या इमारतीचा ढाचा फक्त ७० दिवसांमध्ये तयार करण्यात आला आहे. सध्या या इमारतीच्या अंतर्गत भागाचे काम सुरू आहे.

ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या इमारतीत केली जाणार आहे. या इमारतीमध्ये ४०० हून अधिक विद्यार्थी राहू शकणार आहेत. २०१७ च्या मे महिन्याच्या सुरुवातीला या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल.