घर चालवायचे असेल तर पैसा हवा आणि पैसा हवा असेल तर चांगली नोकरी हवीच. या नोकरीतून दरमहिन्याला येणारा पगार किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे चांगला पगार असलेली नोकरी किती महत्त्वाची आहे हे सांगायला नको. पण जर तुम्हाला कोणी असे सांगितले की तुम्हाला नोकरी आणि त्याचबरोबर २ एकर जमीन कायस्वरूपी राहायला दिली तर..आता तुम्ही म्हणाल कोण कशाला पगारासोबत २ एकर जमीन देईल तिही फुकटात…
हा पण हे खरे आहे.. कॅनडामधल्या एका दुकानाने चांगले कर्मचारी मिळवण्यासाठी एक जाहिरात केली आहे. जर एखादा कर्मचा-याची येथे काम करण्यासाठी निवड झाली तर त्याला पगारासोबत २ एक जमीन दिली जाईल. कॅनडा हा देश श्रींमत आहे. या देशातील लोकांनी जीवनशैली सधन आहे. लोकांना चांगला पगारही मिळतो, तशा नोकरीच्या संधीही खूप आहेत पण माणसे कमी आहे. हिच समस्या कॅनडामधल्या ‘द फार्मर्स डॉटर कंट्री मार्केट’चीही होती. त्यामुळे कर्मचारी मिळवण्याकरता त्यांनी आपल्या फेसबुकपेजवर चांगली जाहिरात केली आहे. ‘आम्ही तुम्हाला गलेलोठ्ठ पगार तर देऊ शकत नाही. पण तुम्हाला सुखी आणि शांततापूर्ण जीवन नक्की देऊ शकतो.’ अशा प्रकारची जाहिरात त्यांनी केली आहे. या कंपनीसाठी ज्या कर्मचा-यांची निवड होईल त्याला पगाराबरोबर निसर्गाच्या सानिध्यात दोन एकर जमीन देण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. जर एखाद्या कर्मचा-याने पाच वर्षाहूंन अधिक काळ येथे काम केले तरच त्याच्या नावावर कायदेशीरित्या ही जमीन करण्यात येईल असे म्हटले आहे. ही जाहिरात वाचून आतापर्यंत अनेकांनी अर्ज पाठवले आहे. या अर्जातून ३ मुलींची आतापर्यंत निवड करण्यात आली आहे.

Story img Loader