Weird Wedding Card Viral : लग्नाआधी सर्वात चर्चेत कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे लग्नपत्रिका. कारण हल्ली लोक अशा काही फॅन्सी आणि हटके लग्नपत्रिका छापतात की पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. लोक लग्नाप्रमाणेच पत्रिकांवरही चिक्कार पैसा चर्च करतात. अनेकदा तुमच्या घरीही अशा हटके युनिक लग्नपत्रिका आल्या असतील. पण, सोशल मीडियावर सध्या अशी एक लग्नपत्रिका व्हायरल होतेय, वाचून लोक आश्चर्यचकित नाही तर चक्क घाबरलेयत. का तर त्याला कारणही तसेच आहे. कारण या लग्नपत्रिकेची सुरुवातच इतकी खतरनाक आहे की, वाचून नक्की लग्न कोणाचं आहे असा प्रश्न पडेल.
“अमंगल गुटखा खाद्यम धूम्रपानम्, …”, लग्नपत्रिकेवरील विचित्र श्लोक
दरम्यान, अनेकांनी ही लग्नपत्रिका पाहून सामान्य विवाह सोहळ्याच्या पत्रिकेची यातून खिल्ली उडवली जात असल्याचे म्हटले आहे. या लग्नपत्रिकेची सुरुवातच अतिशय भयानक वाक्याने होतेय. ती म्हणजे, खतरनाक विवाह- मासूम बराती, याच्याच खाली एक श्लोक लिहिला आहे तोही विचित्र पद्धतीने, “अमंगल गुटखा खाद्यम धूम्रपानम्, अमंगलम् सर्वव्यसनम्…” पारंपरिक लग्नपत्रिकेतील भाषेची नक्कल करून ही पत्रिका तयार करण्यात आली आहे.
b
पुढे वधू-वराचे नाव आणि सविस्तर माहिती लिहिलीय, वधूचे वर्णन, दुर्भाग्यवती- बीडी कुमारी ऊर्फ सिगरेट देवी, कुपुत्री : श्री. तंबाखू लालजी एवं श्रीमती सुलफी देवी, निवास : ४२०, यमलोक हाऊस, दुख:नगर
यानंतर वराचे नाव आणि माहिती लिहिलीय, मृतात्मा – कॅन्सर कुमार ऊर्फ लाइलाज बाबू, कुपूत्र : श्री. गुटखा लाल जी एवं श्रीमती भांग देवी, निवास : गलत रास्ता, व्यसनपूर (नशाप्रदेश)
लग्नपत्रिकेत तंबाखू किंवा गुटख्यासारख्या गोष्टींचा उल्लेख
या पत्रिकेतील सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे, लग्नाचे स्थळ आणि वेळ. पत्रिकेत लग्नाचे स्थळ आहे, स्मशानभूमी आणि वेळ अनिश्चित. इतकेच नाही तर पत्रिकेत अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत की वाचणाराही कोमात जाईल. दरम्यान, या लग्नपत्रिकेत तंबाखू किंवा गुटख्यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे, शिवाय या पदार्थ्यांच्या सेवनाने होणारे आजार आणि त्यानंतरची परिस्थिती नमूद आहे.
दरम्यान, या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून कॅन्सरला कारणीभूत घटक दारु, सिगारेट, गुटखा आदी घातक पदार्थांपासून दूर राहण्याचे जरा हटके पद्धतीने आवाहन केले आहे.
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
अतिशय विचित्र आणि अनोखी लग्नपत्रिका @vimal_official_0001 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे, ज्यावर लोकांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने पोस्टवर कमेंट करत लिहिले की- भाऊ, आम्ही या लग्नात येऊ शकणार नाही, आम्ही तुम्हाला आधीच सांगत आहोत. दुसऱ्याने लिहिले, सर्जनशीलतेचे कौतुक केले पाहिजे आणि ज्याने हे प्रकरण लिहिले आहे त्याला २१ तोफांची सलामी दिली पाहिजे.