Viral Video: कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे. या आजाराचे निदान झाल्यास पिडीत व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय मानसिकदृष्ट्या खचून जातात. मोठ्या धीराने कर्करोगाचा सामना करावा लागतो. कॅन्सरच्या उपचारादरम्यान रुग्णाच्या शरीरावर खूप परिणाम होत असतो. काहींचे वजन कमी होते, तर काहीजण खूप अशक्त होतात. उपचार सुरु असताना अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांचे केस गळून टक्कल पडायला सुरुवात होते. केस गळण्याची ही बाब महिला रुग्णांसाठी खूप त्रासदायक असते.
सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओची मोठी चर्चा आहे. या व्हिडीओमधील एक किशोरवयीन तरुणी कर्करोगाशी लढा देत आहे असे म्हटले जात आहे. गंभीर आजारावरील उपचार सुरु असताना तिचे केस गळू लागले. यामुळे ती प्रचंड दु:खी होते. आपल्या लाडक्या मैत्रिणीला मानसिक बळ देण्यासाठी त्या तरुणीचे मित्र देखील केस कापून टक्कल करतात. ती तरुणी जेव्हा हॉस्पिटलमधून घरी परतते, तेव्हा सर्व मित्रमंडळी तिला भेटायला जातात. अशी या व्हिडीओची पार्श्वभूमी आहे.
व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला ती कॅन्सरग्रस्त तरुणी घरात उभी असल्याचे दिसते. पुढे तिच्या घराच्या दारात तिचे मित्र जमतात. त्यांनी आपल्याला मानसिक पाठिंबा देण्यासाठी आपले केस कापून टक्कल केलं आहे हे समजून त्या तरुणीला अश्रू अनावर होतात. घरातल्या एका मैत्रिणीला ती रडत मिठी मारते. त्यानंतर सर्वजण घरामध्ये प्रवेश करतात. त्यांना पाहिल्यावर ती मुलगी पुन्हा एकदा रडायला लागते. तिची मैत्रीण हा प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
@GoodNewsMVT या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला त्यांनी कोणीही कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात एकटं नाहीये असे कॅप्शन दिले आहे. १५,००० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक ट्विटर यूजर्सनी या व्हिडीओखाली कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या मैत्रिणीला मानसिक बळ देणाऱ्या त्या मित्रांचे नेटकरी कौतुक करत आहेत.