देशामध्ये आज इंधनाच्या दरांमध्ये काहीच बदल झालेला नाही. मात्र मागील दोन महिन्यांमध्ये देशातील इंधनाचे दर प्रती लीटरमागे दहा रुपयांनी वाढले आहेत. इंधनाची शेवटची दरवाढ ही गुरुवारी म्हणजे १६ जुलै रोजी झाली होती. गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर आता १०१.५४ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर  प्रतिलिटर ८९.८७ रुपये असा झाला आहे. गेल्या ४ मेपासून पेट्रोलच्या दरात ४० वेळा तर डिझेलच्या दरात ३७ वेळा वाढ करण्यात आली. देशामध्ये गुरुवारच्या आधी तीन दिवस इंधनाचे दर स्थिर होते. मात्र गुरुवारी त्यात वाढ करण्यात आली. याच मुद्द्यावरुन काँग्रेसच्या एका युवा नेत्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनोख्या पद्धतीने टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> ‘पाच ट्रिलियनच्या नादात सगळं विकलं’, ‘मोदींच्या तिसऱ्या लाटेपासून देशाला वाचवा’; #Resign_PRimeMinister ट्रेण्डमध्ये

कर्नाटमधील काँग्रेसचे तरुण नेते आणि भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी ट्विटरवरुन इंधनदरवाढीसंदर्भातील एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होर्डींग दिसत आहे. तर त्या होर्डींगसमोर एक तरुण अगदी लोटांगण घालून मोदींच्या पाया पडतानाही दिसत आहे. हा फोटो शेअर करत श्रीनिवाय यांनी स्वत: त्याला काही कॅप्शन देण्याऐवजी आपल्या फॉलोअर्सकडूनच या फोटोला काहीतरी छान कॅप्शन द्या असं म्हणत कमेंट करण्यास सांगितलं आहे.

१६ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोला सहा तासांमध्ये दोन हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. या फोटोवर ४०० हून अधिक जणांनी आपल्या प्रतिक्रिया पहिल्या सहा तासांमध्ये नोंदवल्या आहेत. तर ११ हजारांहून अधिक जणांनी हा फोटो लाइक केलाय.

सातत्याने करण्यात येणाऱ्या दरवाढीमुळे महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब आदी राज्यांमधील बहुसंख्य ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून इंधनदरवाढीविरोधात हॅशटॅग मोहिम हाती घेतल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल नेटवर्किंगवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या समर्थकांनी ट्विटरवर #Resign_PRimeMinister हा हॅशटॅग वापरुन आपला संताप मागील काही दिवसांपासून व्यक्त करत आहेत. एकीकडे देशामधील पेट्रोल, खाद्यतेल, भाज्यांचे दर वाढलेले असतानाच दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था, नोकऱ्यांची संधी, रोजगार आणि जीडीमध्ये घट होतानाचे चित्र दिसत असल्याची टीका केली जात आहे. #Resign_PRimeMinister या हॅशटॅगमधील प्राइम शब्दातील पी आणि आर ही अक्षर मुद्दाम कॅपीटलमध्ये वापरुन मोदी केवळ जाहिरातबाजी करणारे पंतप्रधान असल्याचा टोला लगावण्यात आलाय.