भारताला उपांत्य फेरीत जाण्याची कोणतीही संधी नव्हती आणि हे विराट कोहली आणि रवी शास्त्री या दोघांनाही माहीत होते की त्यांचा एकत्र प्रवास संपला आहे. सोमवारी दुबईत भारताने विजय मिळविल्यानंतर कॅमेऱ्यांनी भारताचा कर्णधार कोहली मुख्य प्रशिक्षक शास्त्री आणि त्यानंतर फिरकीपटू आर अश्विन आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना मिठी मारतानाचा एक खास क्षण कैद केला. हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
भारताचा टी २० कर्णधार म्हणून कोहलीचा हा शेवटचा सामना होता. रवी शास्त्री, अरुण यांचा भारताचा प्रशिक्षक म्हणून शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्यांनी भावनिक होऊन एकमेकांना मिठी मारली. या भावनिक क्षणाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
( हे ही वाचा: करीना कपूरच्या दुपट्टा मेरा गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल! )
सोशल मीडिया कोहलीने शास्त्री आणि अरुण यांना मिठी मारल्याचे फोटो आणि व्हिडीओंनी भरून गेले होते. अगदी आयसीसीनेही आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ क्लिपिंग शेअर केली आहे.
( हे ही वाचा: आनंद महिंद्रा म्हणतात “तुम्हाला पराभवाची भीती वाटते?” तर या लहान मुलाचा व्हिडीओ नक्की पाहा )
नेटीझन्स प्रतिक्रिया
या व्हिडीओला आत्तापर्यंत ३८५ हजार लोकांनी बघितला आहे. हा व्हिडीओ बघणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यावर नेटीझन्सने असंख्य कमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडीओ बघून नेटीझन्स स्वतः भावनिक झाले आहेत.